walse patil photo
walse patil photo 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीला संधी सोलापूरकरांच्या जवळ जाण्याची 

प्रमोद बोडके

सोलापूर : लिंगायत, पद्मशाली, मुस्लिम आणि दलित हे प्रमुख समाज सोलापूर शहरात आहेत. सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अलीकडच्या काळात या समाजामधील प्रभावी नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे शहर राष्ट्रवादी ही लिमिटेड पार्टी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूरच्या पालकमंत्रिपदाचा धुरा राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोलापूरकरांच्या जवळ जाण्याची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आली आहे. 
हेही वाचा - आमदार रोहित पवार पत्नीसाठी साडी घेतात तेव्हा... 
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर शहराची नस बरोबर ओळखली होती. या शहरातील विविध जाती व धर्मांच्या प्रभावी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या शहरात त्यांनी ताकद निर्माण केली होती. नंतरच्या काळात लिंगायत, पद्मशाली, मुस्लिम आणि दलित समाजातील प्रभावी कार्यकर्ते व नेते राष्ट्रवादीत न आल्याने शहरात राष्ट्रवादीच्या विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. विधानसभेत 1990 पासून आंबेगावचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना सोलापूरच्या पालकमंत्रिपदाचा जबाबदारी देण्यात आली आहे. वळसे-पाटील यांच्या अनुभवाचा फायदा सोलापूरकरांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. 
हेही वाचा - शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार होता, त्याचं काय झालं? 
सोलापूर शहरातील यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. विडी उद्योग असो की यंत्रमाग उद्योग कामगारांना आर्थिक सुरक्षितता आवश्‍यक आहे. भविष्य निर्वाह निधीचाही प्रश्‍न अद्यापही कायम आहे. विडी उद्योग येत्या काळात संपुष्टात येणार असल्याने गारमेंट उद्योगाकडे जाण्यासाठी सोलापूरची मानसिकता तयार होऊ लागली आहे. गारमेंट उद्योगासाठी सोलापुरात पोषक वातावरण आहे. या उद्योगासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण या बाबी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. कामगारमंत्री पदाच्या माध्यमातून सोलापूर शहर राष्ट्रवादीला तेलुगू भाषिकांमध्ये जाण्याची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ राष्ट्रवादी कसा घेते? यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT