Order to inquire the municipal election expenses marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीतील खर्चाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

नगर : महापालिका निवडणुकीत करण्यात आलेल्या खर्चाची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या खर्चाबाबत आक्षेप घेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणी दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे जाधव यांनी सांगितले. 
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाकडे दाखल असलेल्या बिलांबाबत जाधव यांनी सवाल उपस्थित केले होते.

संगनमताने केलेला गैरव्यवहारच

महापालिका व लोकसभा दोन्ही निवडणुका जिल्हाधिकाऱ्यांच्याच नियंत्रणाखाली झाल्या. त्यामुळे दोन्ही ठिकाणी झालेल्या खर्चाची व दराची माहिती त्यांना असायला हवी होती. मात्र, दोन्ही ठिकाणच्या दरातील तफावत आणि महापालिकेने काही वस्तूंवर केलेला अवाजवी खर्च पाहता, सर्व सहमतीने व संगनमताने केलेला हा गैरव्यवहारच असल्याचे बिलांमधून स्पष्ट होते, असा दावा जाधव यांनी याचिकेत केला आहे.

दोन आठवड्यांत शपथपत्र दाखल करा

त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने, स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करावी. त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा व जिल्हाधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांत शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिल्याचे जाधव यांनी सांगितले. जाधव यांच्यातर्फे ऍड. विजय लटंगे यांनी काम पाहिले. 

तत्कालीन शहर अभियंताही जबाबदार

निवडणुकीतील खर्चाचा हा घोटाळा मोठा आहे. यात बिलांची तपासणी करणारे तत्कालीन शहर अभियंता विलास सोनटक्के हेही जबाबदार आहेत. त्यांचीही या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT