पश्चिम महाराष्ट्र

‘अतिरिक्त सहाय्यक संचालक’; तालुका पंचायतीत नवे पद

राज्य शासनाचा आदेश; ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना मिळणार बढती

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : तालुका पंचायतीमध्ये यापुढे रोजगार हमी योजनेच्या सहाय्यक संचालकांसह अतिरिक्त सहाय्यक संचालक हे नवे पदही असणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा आदेश बजावला आहे. त्यामुळे तालुका पंचायतीमध्ये अतिरिक्त सहायक संचालक हे नवे पद निर्माण झाले आहे. या पदावर बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना (पीडीओ) बढती मिळणार आहे.

कित्तूर तालुका पंचायत वगळता राज्यातील २२७ तालुका पंचायतींमध्ये हे नवे पद अस्तित्वात येत आहे. तालुका पंचायतीचा कारभार तालुका कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतो. तर त्यांच्या खाली रोहयो सहाय्यक संचालक असतात. राज्यात रोजगार हमी योजनेची सुरुवात झाल्यानंतर तालुका पातळीवर सर्व कामे पाहण्यासाठी तालुका प्रोग्राम ऑफिसर हे पद अस्तित्वात आले होते. नंतर त्याला कायमस्वरूपी पदनाम देत ‘रोहयो सहाय्यक संचालक’ असे करण्यात आले. पीडिओंना त्यावर बढती मिळत होती. पण तालुका पंचायतींची संख्या पाहता केवळ तीन टक्के पीडिओना ही बढती मिळत होती.

राज्यात सात हजार पीडिओ असून त्यांना बढती द्यावयाची झाल्यास सहाय्यक संचालक म्हणून तालुका पंचायतीवर बढती दिली जाते. पण बहुतेक पीडिओंना संपूर्ण सेवा कालावधीत एकही बढती मिळणे अवघड जात होते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी नव्या २२७ अतिरिक्त सहाय्यक संचालक पदांची निर्मिती केली आहे. आता बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडीओंना संधी मिळेल.

प्रत्येक तालुका पंचायतीच्या व्याप्तीमध्ये ५० हून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक पंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे पाहणे सहाय्यक संचालकांना शक्य नसल्याने हे नवे पद अस्तित्वात आले आहे. ग्रामपंचायतींकडून हाती घेण्यात येणाऱ्या सर्व रोजगार हमी योजनेच्या कामावर दोन्ही अधिकारी मिळून लक्ष ठेवले सोपे जाणार आहे.

१३ तालुक्यात पदे भरणार

बेळगाव जिल्ह्यात १४ तालुका पंचायती असून कित्तूर वगळता इतर १३ तालुका पंचायतीमध्ये लवकरच ही पदे भरली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT