narsayya aadam.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

...अन्यथा दिल्लीपेक्षा वाईट अवस्था करू

सकाळवृत्तसेवा

सांगली- देशाच्या संविधानाच्या विरोधातील सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायदा मागे घ्यावा अन्यथा मोदी सरकारची अवस्था दिल्लीपेक्षा वाईट केली जाईल. तुमचे नामोनिशान मिटवले जाईल असा इशारा कम्युनिस्ट नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी येथे दिला. 


सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याविरोधात स्टेशन चौकातील वसंतबाग मध्ये आयोजित आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. नगरसेविका वहिदा नायकवडी, उमेश देशमुख, उमर गवंडी, रेहाना शेख, जयश्री पाटील, शबाना शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


श्री. आडम म्हणाले, ""सीएए आणि एनआरसी विरोधातील लढाई म्हणजे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई म्हणावी लागेल. या लढाईमध्ये हा 75 वर्षाचा आडम मास्तर तुमच्याबरोबर आहे. लढताना मला जरी गोळी लागली तर चांगला मृत्यू आला असे समजेन. माझ्यावर आतापर्यंत 150 केसेस दाखल आहेत. तरीही मी घाबरत नाही. दिल्लीतील दोन कोटी लोकांनी मोदी सरकारला विधानसभा निवडणुकीत निकाल दाखवून दिला आहे. आता देशातील 130 कोटी जनता निश्‍चितच मोदी सरकारचा निकाल लावेल. देशात आणीबाणी लावणाऱ्या इंदिरा गांधी यांना जनतेने बाजूला केले होते. आता मोदी सरकारला पुढच्या निवडणुकीत किती जागा आल्या ते शोधावे लागेल.'' 


ते पुढे म्हणाले, ""आज देशातील 25 कोटी मुस्लिम चिंतेत आहेत. परंतू या केवळ 25 कोटी लोकांचा विषय नाही. देशातील 130 कोटी लोकांपैकी 90 कोटी लोकांकडे रहिवाशाचे पुरावे नाहीत. मग या सर्व लोकांना कारागृहात टाकणार काय?. तुमच्या सर्वांचा बाप जरी आला तरी ते शक्‍य होणार नाही. देव, अल्ला, संविधान आणि तिरंगा या गोष्टी हातात घेऊन मोदी सरकारविरोधात आम्ही सर्व उभे आहोत. मोदींनी हे कायदे मागे घ्यावेत अन्यथा त्यांचे नामोनिशान राहणार नाही. जेव्हा पर्यंत भारत राहील तेव्हापर्यंत तुमचे नाव येथे राहणार नाही. आणि या लढाईत मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.'' 
सभेसाठी सांगली परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT