Outbreak of gang war in Tasgaon city; Lenders, gangs swarming through the sand
Outbreak of gang war in Tasgaon city; Lenders, gangs swarming through the sand 
पश्चिम महाराष्ट्र

तासगाव शहरात टोळी युद्धाचा भडका; सावकारी, वाळूचोरीतून फोफावल्या टोळ्या

रवींद्र माने

तासगाव (जि. सांगली( : तासगाव येथील लवेश धोत्रे या तरुणाच्या खुनानंतर शहरातील तरुण मुलांच्या टोळ्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत हे स्पष्ट झाले. या टोळ्यांवर पायबंद घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. सावकारी, वाळूचोरी, गांजा आणि जुगार यांच्या माध्यमातून या टोळ्या पोसल्या जात आहेत. 


तासगाव शहरात गेल्या काही वर्षांत युवकांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्या जातात. कधी सावकारीतून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी, कधी जमिनीवर अतिक्रमण करून त्याला तारेचे कुंपण घालणे, जागा काढून घेणे देणे, वाळू वाहतूक करताना मागेपुढे संरक्षण, गाड्या ओढून आणणे, गांजा विक्री, जुगार अड्डयाचे संरक्षण अशी कामे अंगावर घेऊन या टोळ्या करून देतात.

ही वीस ते तीस वयोगटांतील मुले सर्रास महागड्या मोटार सायकली उडवत बेदरकार फिरत असतात. यांच्यावर ना त्यांच्या पालकांचे नियंत्रण ना पोलिसांचे! यामुळे दिवसेंदिवस या टोळ्या बेदरकार होऊ लागल्या आहेत. लवेश धोत्रेच्या खुनानंतर या टोळ्यांची एक बाजू समोर आली आहे. अशा अनेक टोळ्या शहरात सध्या कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे केवळ झोपडपट्टीतीलच मुले नव्हे तर चांगल्या घरातील मुलेही यामध्ये ओढली गेली आहेत. याला काही राजकीय पुढारी खतपाणी घालत असताना दिसत आहेत. लवेश धोत्रेच्या प्रकरणानंतर पोलिसांसमोर या टोळ्यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील "पोलिसिंग' संपले आहे. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. 


लवेश धोत्रेच्या खुनापर्यंत दोन-तीन महिने दोन गटात संघर्ष सुरू होता. यापूर्वी दोन-तीन वेळा दोन्ही बाजूच्या युवकांवर गुन्हेही दाखल आहेत. वास्तविक यापूर्वीच पोलिसांनी यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र ते न झाल्याने हकनाक एकाचा बळी गेला. आता एक बळी गेल्यानंतर तरी पोलिस आपला पोलिसी हिसका दाखवतील अशी अपेक्षा आहे. या निमित्ताने तरी पोलिसांनी बाहेर पडून या टोळ्यांना वेसण घालावे, अशी मागणी पुढे येत आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT