BJP MLA Gopichand Padalkar mother Hirabai Padalkar win  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result : सांगलीत राष्ट्रवादीला दणका; आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी विजय!

पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होत्या.

सकाळ डिजिटल टीम

पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होत्या.

सांगली : आटपाडी तालुक्यातील (Atpadi Taluka) पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची एकतर्फी सत्ता आलीये. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर (Hirabai Padalkar) ह्या सरपंच पदावर विजयी झाल्या आहेत.

आटपाडीतील पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होत्या. या निवडणुकीत हिराबाई कुंडलिक पडळकर या विजयी झाल्या आहेत. सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत.

याशिवाय, पडळकरवाडी ग्रामपंचायतीवरही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आलीये. गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना विराजमान झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT