Panchpute says I am ok dont worry 
पश्चिम महाराष्ट्र

पाचपुते म्हणतात, मी ठणठणीत, काळजी नसावी!

संजय आ. काटे

श्रीगोंदे  : मतदारसंघाचा विकास गेली पाच वर्षे खोळंबला होता. आमदार नसतानाही लोकांच्या कामात व्यस्त असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष झाल्याने आजारी पडलो. मात्र, त्यातून विरोधकांनी अफवांचे पीक उभे केले. काळजी करू नका, मी पूर्ण ठणठणीत आहे. थांबलेला विकास पुन्हा एकदा जोमात सुरू करण्यासाठी सज्ज झालो आहे, असा विश्वास आमदार बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला. 

पत्रकारांशी बोलताना पाचपुते म्हणाले, ""काही काळ आजारी होतो, त्यात विधानसभा निवडणूक लागली. डॉक्‍टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला; मात्र तो पाळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे आजार वाढला. विधानसभा जिंकल्यानंतरही मतदारसंघातील लोकांशी नेहमीप्रमाणे चर्चा करता आली नाही. मात्र, आपल्या आजारपणाचे काही लोकांनी भांडवल केले. गंभीर आजारी असल्याचे सांगून, वास्तवापासून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला होता.'' 

सुडाचे राजकारण करणार नाही 

"कुणालाच काही शंका नको, म्हणून सगळ्या चाचण्या केल्या; मात्र आजच काय पुढची पाच वर्षे कुठलाही आजार होणार नाही, असे प्रमाणपत्र मिळाले आहे,' असे सांगत पाचपुते म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत अपेक्षित मताधिक्‍य मिळाले नाही, त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, निवडणूक संपली, त्याच वेळी आपण राजकारण बाजूला ठेवले. आयुष्यात कधीच विरोधकांशी सुडाचे राजकारण केले नाही, करणारही नाही. लोकांनी आपल्याला मोठे केले, त्यांच्या उपकारातच राहील. कुठल्याही विरोधकावर आकस ठेवू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत.'' 

आघाडीचे मंत्री जुने सहकारी 

पाचपुते म्हणाले, ""विधानसभेत आमदारांमध्ये पहिली शपथ आपली झाल्याने जबाबदारीची जाणीव आहे. सध्या भाजपचे सरकार नसले, तरी आपल्याला काळजी नाही. मतदारसंघाचा विकास कसा साधायचा, याचा अनुभव आहे. गेली पाच वर्षे सगळा विकास थांबल्याने आता जोमाने कामाला लागलो आहे. मंत्रिमंडळातील मंत्री जुने सहकारी असल्याने आपला आदर ठेवून कामे करतात. कुणीही काळजी करू नका. श्रीगोंदे मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी समर्थ आहे.'' 
प्रा. तुकाराम दरेकर, विक्रमसिंह पाचपुते, अशोक खेंडके, बापूराव गोरे, संतोष खेतमाळीस, सतीश पोखर्णा, संतोष क्षीरसागर उपस्थित होते. 

श्रीगोंद्यात पत्रकारांसाठी भवन बांधणार 

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार केल्यावर पाचपुते म्हणाले, ""मला सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी पत्रकारांसाठी भवन बांधून देण्याचा प्रयत्न केला. आता श्रीगोंद्यातील पत्रकारांसाठी असे भवन बांधून देण्यासाठी निधीची तरतूद करून लवकरच त्याचे भूमिपूजन करू.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT