Accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

चिक्कोडी : ट्रॅक्टर-कार धडकेत दोन युवक ठार

कब्बूरजवळ अपघात : एक जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : कब्बूर शहराच्या बाहेर निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व कारची समोरासमोर धडक झाली. त्यात कब्बूर येथील दोघा युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी आहे. त्याला अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय बापू शिवाईगोळ (वय 23) व कारचालक मारुती नागाप्पा हुल्लोळी (वय 23) अशी मयतांची नावे आहेत.

बुधवारी (ता. १) रात्री हा अपघात घडला असून चिक्कोडी पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, बुधवारी (ता. 1) रात्री उसाच्या भरलेल्या चिक्कोडीकडे निघालेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना कारची मागून जोराची धडक बसली. या अपघातात उदय बापू शिवाईगोळ हा जागीच ठार झाला.

तर कारचालक मारुती नागाप्पा हुल्लोळी (वय 23) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरित उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले. तेथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच विशाल भीमाप्पा कांबळे या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, चिक्कोडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद चिक्कोडी पोलिस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT