लाळ खुरकत sakal
पश्चिम महाराष्ट्र

लाळ खुरकतीने कुर्लीतील तीन जनावरे दगावली

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अनिल पाटील

कोगनोळी : कुर्ली येथे लाळ खुरकत आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे लाळ खुरकत लस दोन महिन्यापूर्वीच देणे गरजेचे होते. पण शासनाकडे लस उपलब्ध नसल्याने लसीकरण झालेले नाही. त्याचा फटका निपाणी तालुक्यातील जनावरांना बसला आहे.

कुर्ली येथील दिनकर पवार यांची ८० हजाराची म्हस, राहुल सातापा पवार यांची ६० हजाराची गाय व रंगराव दत्तू ढोणे यांची ५५ हजाराची गाय लाळ खुरकत आजाराने दगावली आहेत. गावात शेकडो जनावरे या आजाराने त्रस्त आहेत. येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांचा विमा न केल्याने त्यांना फटका बसला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. निपाणी तालुक्यात लस उपलब्ध करून जनावरांना देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

येणारया 10 तारखेपर्यंत लाळ खुरकत लस उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांची टीम तयार आहे. लस येताच जलद गतीने लस देण्याचे काम पूर्ण होईल.

-डॉ जे. ए. कंकणवाडे पशुवैद्यकीय अधिकारी, निपाणी

परिसरातील जनावरांना लाळ येऊन आजारी आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. लस उपलब्ध होताच लसीकरण केले जाईल.

-डॉ. के. टी. सूर्यवंशी

दोन महिन्यापूर्वीच लसीकरण व्हायला पाहिजे होते. लसीकरण न झाल्याने अनेक जनावरे आजारी असून जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी. शासनाने लस उपलब्ध करून देऊन लसीकरण ताबडतोब करावे.

-लक्ष्मण नेजे सामाजिक कार्यकर्ते, कुर्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

Pune Transport Strike: टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात पाच मार्चपासून बेमुदत आंदोलन

Agra STF Encounter: एसटीएफचा 'धडाका'! शार्पशूटर गुंडाचा आग्र्यात एन्काउंटर; १० वर्षांपूर्वी लुटलेली सरकारी पिस्तूल अखेर जप्त

Devotional Journey: शेगाव वारीचा अलौकिक अनुभव! डोळे भरून दर्शन घेताच जीवन कृतार्थ झालं

Niphad Online Ration Card : जुनी रेशनकार्ड इतिहासजमा; आता घराघरात ई-शिधापत्रिका, गैरव्यवहाराला बसणार पूर्ण आळा

SCROLL FOR NEXT