Accident Sakal
पश्चिम महाराष्ट्र

पट्टणकुडीजवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

रात्री 10.30 च्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात होऊन एक जण ठार तर तीघेजण जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

पट्टणकुडी : येथील निपाणी चिक्कोडी (Nipani Chikkodi) राज्यमार्गावर पट्टणकुडी जवळील हॉटेल एबीएनजवळ शनिवारी (ता. 19) रात्री 10.30 च्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात (Accident) होऊन एक जण ठार तर तीघेजण जखमी झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पट्टणकुडी येथील अक्रम अनिस मुल्ला व अन्य तिघेजण इंडिका कार (एमएच 02, एएल 1159) घेऊन निपाणीहुन पट्टणकुडीकडे येत होते. हॉटेल एबीएनजवळ आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याकडेला असलेल्या एका झाडावर आदळून बाजूच्या शेतात पलटी झाले. यामध्ये अक्रम मुल्ला यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात सोहेल अस्कर मुल्ला (वय २१), सुभान अस्लम मुजावर (वय २०), ससिफ इजाज मुल्ला (वय २४)

या तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. आक्रम हा फरशी बसविण्याचे काम करत होता. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT