CORONA TUBE 
पश्चिम महाराष्ट्र

लागण नसतानाही कोरोना लागला जीव घ्यायला...

शांताराम काळे

अकोले : कोरोनाची बाधा झालेल्या लोकांचा आकडा हजाराच्या आसपास असला तरी संपूर्ण मानव जातीचं जीणं हराम केलं आहे. काहींच्या तो नोकऱ्या खायला लागलाय तरी काहींना उपासमार सुरू लागलाय. त्याने नातीही तोडायला सुरूवात केलीय. उपासमार सुरू झाल्याने लोकांनी मृत्यूला कवटाळायला सुरूवात केलीय. अकोल्यातही असंच काहीसं घडलं.

पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नाही. मोलमजुरी बंद झाली. उपासमारीमुळे विधवा महिलेने आयुष्यच संपविण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने हा प्रकार शेजारील एका कार्यकर्त्याच्या लक्षात आल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. सोमवारी (ता. 6) दुपारी अकोल्यात हा प्रकार झाला.

कोरोनाच्या संकटामुळे उपासमार सुरू झाल्याने दोन लहान मुलांना वाऱ्यावर सोडून महिलेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीचे निधन झालेले. मुले शिक्षण घेतात. चार घरची धुणीभांडी करून कशीतरी ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे सगळी परिस्थिती बदलली. कोणीही घरी कामाला बोलविना. हाताला काम नाही. घरात खायला काही नाही. कसे जगायचे, पुढे काय, असे अनेक प्रश्‍न तिच्यासमोर उभे राहिले. या प्रश्‍नांतून सुटका करून घेण्यासाठी तिने मरणाला जवळ केले. 

गळ्याला फास लावून ही महिला जीवन संपविण्याच्या प्रयत्नात असतानाच, शेजारी राहणारे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद रूपवते यांनी हा प्रकार पाहिला. क्षणाचाही विलंब न लावता, त्यांनी महिलेने घराचा आतून बंद केलेला दरवाजा तोडून तिचा जीव वाचविला. 
मिलिंद रूपवते यांनी तातडीने या घटनेची माहिती नगरसेविका स्वाती शेणकर यांचे पती संदीप शेणकर व शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन नाईकवाडी यांना कळविली. त्यांनी तहसीलदार मुकेश कांबळे व पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांच्या कानावर ही घटना घातली. तहसीलदार कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन महिलेला धीर दिला. तिला तातडीने अत्यावश्‍यक धान्य, किराणा व भाजीपाला घरपोच करून आधार दिला. 
सामाजिक कार्यकर्ते नितीन नाईकवाडी, डॉ. आशिफ शेख, संदीप मोरे, समीर डोंगरे, विजय गरुड यांनी या कुटुंबाशी व शेजारच्या लोकांशी संवाद साधला. त्यांना आधार देत मदत केली. या घटनेमुळे शहरात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची आर्थिक कुचंबणा व मुस्कटदाबी समोर आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT