people sleep on the rod for correction of aadhar card 
पश्चिम महाराष्ट्र

इथे ‘आधार’साठी लोक झोपतात रस्त्यावर...

चेतन लक्‍केबैलकर

बेळगाव (खानापूर) - सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद नांदावा, अशी अपेक्षा असते. मात्र, सध्या सरकारी योजनांनी सर्वसामान्यांना रस्त्यावर आणल्याचा प्रत्यय येत आहे. आधार कार्डच्या दुरुस्तीसाठी लोकांना केंद्रांसमोर रात्रीच ठाण मांडून बसावे लागत असल्याचे भयंकर चित्र खानापुरात समोर आले आहे. याची कुणी दखल घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

‘आधार’ दुरुस्तीसाठी सामान्य माणसांची फरपट

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्‍यातील आधार दुरुस्तीसाठी सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. दुरुस्तीसाठी कुटुंबीयांची उपस्थिती आवश्‍यक आहे, पण प्रत्येक दिवशी निर्धारित आधार कार्डांचीच दुरुस्ती केली जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिकांना लहान मुलांसह केंद्रासमोरच येऊन झोपावे लागत आहे. हा एवढा प्रकार सकाळी आधारकार्डसाठी नंबर लावण्यासाठी केला जात आहे. रात्रभर आधार केंद्राबाहेर झोपणाऱ्यांमध्ये लहान मुलेही असल्याचे दिसून येते. मंगळवारी (ता. १०) असाच प्रकार शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिसला. त्यांची चौकशी केली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

‘सकाळ’ ने ही परवड आणून दिले निदर्शनास

तोपिनकट्टीत्याबाबत ‘सकाळ’ला माहिती मिळताच ‘सकाळ’च्या टीमने भेट देऊन नागरीकांची मते जाणून घेतली.आधार कार्ड दुरूस्तीसाठी होत असलेली परवड तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. 
यावेळी त्यांनी सध्या काहीच करता येत नाही. पण, उद्या बुधवारी याबाबत केंद्रप्रमुखांशी चर्चा करून तोडगा कढण्याची हमी ‘सकाळ’ला दिली. 

बालकासह थंडीत रात्रभर प्रचंड थंडी आणि त्यात उघड्यावर झोपण्याची वेळ आली असल्याचे येथे आलेले लोक सांगतात. आधार केंद्राबाहेर झोपण्याची तयारी करत असलेल्यांमध्ये एक वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. रोज रोजंदारी करणाऱ्यांना सकाळी नंबर लावून आधारकार्ड दुरूस्ती करणे शक्‍य नाही. खेड्यांतून येणाऱ्या लोकांची परवड होत आहे. त्यामुळे आता एवढ्या रात्री परत जाणे शक्‍य नसल्याने येथेच झोपावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रोज आधार दुरुस्तीसाठी येत आहे, पण नंबर काही लागत नाही. त्यासाठी आताच एक वर्षाच्या बाळाला घेऊन आलो आहे. सगळे कुटुंबीय येथेच झोपणार आहोत. सकाळी काम झाल्यानंतर जाणार. शासनाची ही सक्ती अन्यायकारक आहे, पण आमचे कोण ऐकणार? - पांडुरंग चिकदिनकोप्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT