sangli.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबईकरांनो सांगलीकर आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही : नितीन कापडणीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : मुंबई पालिकेतील अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सांगलीमध्ये मदतकार्य केले. स्वतः आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी हजर राहून सांगलीतील आपत्ती व्यवस्थापनाला योग्य दिशा दिली. याबद्दल सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.

कापडणीस आपल्या आभार पत्रात म्हणतात -

देवदुतासारख्या धावून आलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष आभार. केवळ आपल्यामुळेच पूरपरिस्थितीवर फक्त ७ दिवसांतच मात करणे शक्य झाले. सांगली एका आठवड्यातच मुळ पदावर आली याचं सारं श्रेय तुम्हाला!

कर्तव्याप्रती निष्ठा, वरिष्ठांबद्दल अतोनात आदर, स्वत:ला मनापासून कामात झोकून देणे, प्रचंड शिस्तबध्दता, उत्साह या गोष्टी आपल्याकडून शिकायला मिळाल्यात. आडनावाप्रमाणेच सरदाराची भूमिका बजावलेले सरदार साहेब, २४ तास उत्साही दिसणारे दळवी साहेब, कमी कालावधीत आमच्या ड्रेनेजच्या माेठ्या समस्या सोडविणारे कोळेकर साहेब, एका हाकेला धावून येणारे फायर ब्रिगेडचे यादव साहेब, सोबत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्याला सलाम!

आम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वत:च्या सैन्यासह धावून आलेले मा. आयुक्त श्री. परदेशी सर ज्यांच्या एका बैठकीतील मार्गदर्शनामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र मिळून योग्य दिशा मिळाली त्यांचेही विशेष आभार!

मुंबईकरांनो सांगलीकर जनता आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही! आपलाच

- नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली महानगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: बदलापूर स्वीकृत नगरसेवक प्रकरणी नवा ट्विस्ट, भाजपने दिला मुस्लिम उमेदवार; दंगलीचे गुन्हे असल्याचा आरोप

Malegaon Municipal Election : माजी उपमहापौराच्या पोराला रोखण्यासाठी वेगळी खेळी; मालेगावात राजकीय डावपेच, AIMIM च्या अब्दुल मलिकांसमोर मोठं आव्हान

Latest Marathi News Live Update : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर यांचे प्रभावी शक्तिप्रदर्शन

Gold Price Today : जळगाव सुवर्णनगरी हादरली! सोन्यात ४२०० तर चांदीत १९ हजारांची मोठी वाढ

Nagpur fraud: नागपुरात जमीन व्यवहारात बिल्डरची ११.७७ कोटींनी फसवणूक; भूखंडांची परस्पर विक्री, धक्कादायक माहिती उघड!

SCROLL FOR NEXT