mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

तालुक्याच्या राजकारणामध्ये महिलांना जनतेचे पाठबळ - शीलाताई शिवशरण

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या पटांगणामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या हस्ते तालुक्यातील स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त मंगळवेढा शहर करण्यामध्ये योगदान दिलेल्या नगराध्यक्षा अरुण माळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील व नोटरी पदी निवड झाल्याबद्दल अॅड धनंजय जाधव यांचा तसेच समाजकल्याण विभागाच्या योजना चांगल्या राबविल्यामुळे शिलाताई शिवशरण यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे सभापती प्रदीप खांडेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, सोमनाथ माळी, येताळा भगत, माजी सभापती नंदकुमार पवार सचिन शिंदे तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे पोपट पडवळे संजय पवार फिरोज मुलाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा म्हणाले की राजकारण हे काही क्षणापुरते आहे. विकास कामे करताना शहर व ग्रामीण भागातील नेत्यांनी व जनतेनी राजकीय मतभेद विसरून विकास कामासाठी योगदान देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे शहराचा व ग्रामीण भागाचा नावलौकिक वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यात अलीकडच्या काळामध्ये बदल घडत असून बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तयार होणाऱ्या रोजगाराच्या संधी प्राप्त केल्यास भविष्यात व्यवसायिकांना चांगले दिवस येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT