Belgaum Municipal Election esakal
पश्चिम महाराष्ट्र

ठरलं! महापालिका निवडणूक होणार; विरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

धारवाड खंडपीठात दाखल करण्यात आली होती 'याचिका'

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव (कर्नाटक) : बेळगाव महापालिका निवडणुकीला (Belgaum Municipal Election) स्थगिती मिळावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या (Bangalore High Court) धारवाड खंडपीठात (Dharwad Bench) दाखल करण्यात आलेली अंतरिम याचिका गुरूवारी (ता. १९) न्यायालयाने फेटाळली. बंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे त्या प्रक्रियेला स्थगिती देता येत नाही, असे कारण देत न्यायाधीश एस. आर. कृष्णकुमार (Judge S. R. Krishnakumar) यांनी स्थगितीची मागणी फेटाळली. शिवाय, ती अंतरिम याचिकाही रद्द केली.

महापालिका निवडणुकीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलीय.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित याचिकाकर्त्यांनी गेल्या आठवड्यात अंतरिम याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्या अंतरिम याचिकेवर सोमवारी (ता. २३) सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली. बेळगावचे एक माजी नगरसेवक व शहापूर येथील एका कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केलीय. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात काय होणार? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. २३ ऑगस्ट रोजीच महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

बेळगाव शहराची प्रभाग पुनर्रचना व आरक्षणाविरोधात जानेवारी महिन्यात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांच्यासह दहा जणांनी ही याचिका दाखल केलीय. ती याचिका प्रलंबित असतानाच ११ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर केली. त्यामुळे या दहा याचिकाकर्त्यांच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी अंतरिम याचिका दाखल करून महापालिका निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्या याचिकेवर १६ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. त्या सुनावणीवेळी तब्बल दीड तास युक्तीवाद झाला होता. पण, त्या दिवशी न्यायालयाने निर्णय दिला नव्हता. १९ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार १९ रोजी सुनावणी झाली, त्यावेळी याचिककर्त्यांच्या वतीने ॲड. शिवराज बळ्ळोळी यानी युक्तीवाद केला.

बेळगाव महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेच्या विरोधात याचिका प्रलंबित असताना निवडणूक जाहीर झाल्याचे त्यानी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पण, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यामुळे स्थगिती देता येत नसल्याचे न्यायालयाने सांगितल्या शिवाय अंतरिम याचिका रद्द केली. पण, जानेवारी महिन्यात दाखल केलेली मूळ याचिका अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. अंतरिम याचिका रद्द झाल्यामुळे बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. पण, काही इच्छुकांचे सर्वोच्च न्यायालयातील याचिकेकडेही लक्ष आहे. धारवाड खंडपीठातील याचिकेवर कोणता निर्णय होणार याकडे गुरूवारी दिवसभर बहुतेक सर्व इच्छुकांचे लक्ष लागून होते. स्थगिती न मिळाल्याचे समजताच त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठीची तयारी सुरू केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: निधी नसेल तर सिगारेट अन् दारूवर कर लावा, पण... सुनावणीच्या मध्येच सरन्यायाधीश का संतापले?

सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवर अमित ठाकरेंची हजेरी; अभिजीत दिपकेंची घेतली भेट

FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

ODI World Cup Format: वर्ल्ड कपच्या नव्या फॉरमॅटला विरोध! ICC विरोधात चार देश उभे राहिले, WCA चे पाठबळ मिळाले; कोणासाठी केला जातोय बदल? थेट सवाल

SCROLL FOR NEXT