PETROL DESEL 
पश्चिम महाराष्ट्र

तेलावरून पेटलेला असंतोषाचा भडका विझला ः आता नगरमध्ये मिळेल सर्वांना पेट्रोल-डिझेल

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून जिल्ह्यात शासकीय वाहने, ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा यांनाच पेट्रोल-डिझेलची सुविधा असल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, त्यात दुरुस्ती करण्यात आली असून, पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत पेट्रोल आणि पहाटे पाच ते दुपारी 12 वाजेपर्यंत डिझेल सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे. याबाबतचे दुरुस्ती आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज जारी केले आहेत. पेट्रोल बंद केल्याने जिल्ह्यात असंतोषाचा भडका उडाला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जारी करण्यात आले होते. लॉकडाउनचा दुसरा टप्पा तीन मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी 13 एप्रिल रोजी रात्री पेट्रोल-डिझेल विक्रीसंदर्भात आदेश जारी केले. त्यात सर्व खासगी चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी पेट्रोलविक्री पूर्णतः बंद करण्यात आली.

शासकीय वाहने ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्‍टर, परिचारिका व वैद्यकीय सेवेशी निगडित कर्मचारी यांना ओळखपत्रे तपासून पेट्रोलविक्री करण्यात यावी, याव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल विक्री करण्यास मनाई केली होती. दरम्यान, या आदेशाने निर्माण झालेल्या अडचणींकडे अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सायंकाळी पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत दुरुस्ती आदेश काढण्यात आले. नव्या आदेशानुसार पेट्रोल-डिझेल सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT