Photo missing from Sangli mayor deputy mayor office sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

अवघ्या तासाभरातच महापौर, उपमहापौर कार्यालयातील फोटो गायब 

सकाळ वृत्तसेवा

सांगली  : महापालिकेतील भाजपची सत्ता आज गेली. सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच महापौर आणि उपमहापौर कार्यालयात असलेले भाजप नेत्यांचे फोटो गायब झाले. त्या ठिकाणी आता कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लागतील. 

महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा निकाल भाजपच्या विरोधात गेला आणि अडीच वर्षांची सत्ता संपुष्टात आली. महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी उमेश पाटील यांची निवड झाली. ऑनलाईन निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कोल्हापूरमधून मतदान केले. ते चार वाजता सांगलीत आले. दिग्विजय सूर्यवंशी यांना आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापौर झाल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर सूर्यवंशी महापौर कार्यालयात आले आणि आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी महापौरपदाची सूत्रे घेतली. 

महापौर आणि उपमहापौर कार्यालयात यापुर्वी भाजपची सत्ता असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, खासदार संजय पाटील आदी नेत्यांचे फोटो होते. मात्र, आज निकालानंतर अवघ्या तासाभरात हे सर्व फोटो दोन्ही कार्यालयातून गायब झाले.  


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT