corona
corona 
पश्चिम महाराष्ट्र

पाच दिवसांतच माेहिम फत्ते...

राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) ः लोणी (ता. खटाव) येथील अनिल सदाशिव शिंदे यांनी गावी येण्यासाठी सर्व कायदेशी अटींचे पालन करून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पनवेलहून 300 किलोमीटरचे अंतर पायी कापून पाच दिवसांत आपले गाव गाठले. गावी आल्यानंतरही त्यांनी स्वःतला शेतामध्ये क्वारंटाईन करुन घेऊन नंतरच गावात प्रवेश केला. प्रशासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य केल्याबद्दल लोणीकरांनीही त्यांचे कौतुक केले. 

पनवेल येथे कापडाच्या मिलमध्ये गेली अनेक वर्षे अनिल शिंदे हे काम करत आहेत. लॉकडाउनमुळे अचानक बंद पडलेल्या उद्योग, व्यवसायामुळे खाण्याचे हाल होऊ लागले. हाताला काम नसल्याने त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर अटींची पूर्तता करून गावाकडे जाण्यासाठी मित्र व स्नेहींकडे वाहनाची चौकशी केली. एकट्यासाठी वाहन करणे आवाक्‍याबाहेर असल्याने त्यांनी शेवटी पायी चालत गाव गाठण्याचा निर्णय घेतला. प्रवासाला निघण्यापूर्वी अंथरूण, पांघरूण, बिस्किटाचे पुडे व मोबाईलची व्यवस्था केली. रस्त्याने रणरणते ऊन, त्याचा बसणारा चटका, वादळी वाऱ्याच्या पावसाचा तडाखा सोसत शेकडो किलोमीटरचे अंतर कापत घराच्या ओढीने त्यांची पावलं पडू लागली. रात्री नऊ वाजता कोणतेही गाव न गाठता रोड डिव्हायडरमध्ये अंथरूण टाकायचे. मोबाईलवरून घरी फोन करून कुठे आलोय, ते सांगायचे व पुन्हा मोबाईल स्विच ऑफ करायचा. झोपण्यापूर्वी फक्त एकच बिस्कीटचा पुडा खायचा. तीन तासांची झोप घ्यायची. बरोबर 12 वाजता उठायचे. वाटेत पेट्रोल पंपावर पाण्याच्या बॉटल भरून घ्यायच्या व पुन्हा प्रवासाला सुरवात करायची, असा त्यांचा नित्यक्रम ठरलेला. या प्रवासात त्यांच्याबरोबर परराज्यातील कामगारांचा तांडा होताच. 

मजल-दरमजल करत पाचव्या दिवशी खटाव तालुक्‍याची हद्द येताच घरी, ग्रामपंचायत, पोलिस पाटलांना फोन करून रितसर माहिती देऊन स्वतःला 14 दिवस शेतात क्वारंटाइन करून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडून मगच त्यांनी गावात प्रवेश केला. सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्याबद्दल ग्रामपंचायतीने त्यांचे अभिनंदन केले. सर्वांच्यासाठी त्यांनी आपल्या कृतीने आदर्श घालून दिल्याबद्दल लोणीसहित पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 


अनिल शिंदे यांनी आपल्या कृतीद्वारे गावाला व प्रशासनाला सहकार्य केले. त्यांनी केवळ लोणी गावालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोनाच्या काळात कसे सहकार्य करावे, याचा आदर्श घालून दिला आहे. 

- महेश देवकर, पोलिस पाटील, लोणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

SCROLL FOR NEXT