players of badminton comes in sangli for practice from delhi gujrat in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

बॅडमिंटनमध्ये दबदबा ; दिल्ली, गुजरातमधील बॅडमिंटनपटू सरावासाठी सांगलीत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोनाच्या संकटात अनलॉक प्रक्रियेत इनडोअर बॅडमिंटनला परवानगी दिल्यानंतर हा खेळ पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. बॅडमिंटनमध्ये सांगलीचा दबदबा असून येथे प्रशिक्षणासाठी दिल्ली, गुजरातसह राज्यातील विविध भागातून खेळाडू येत आहेत. यंदाच्या वर्षात स्पर्धा नसल्यातरी आगामी वर्षात कामगिरीसाठी खेळाडू कसून सराव करत आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 23 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रकारच्या मैदानी आणि इनडोअर खेळावर बंधने आली. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वकाही ठप्प झाले. अनलॉकच्या प्रक्रियेत सुरवातीला आऊटडोअर खेळांना परवानगी दिली. परंतु इनडोअर खेळास मनाई केली. या काळात आऊटडोअर बॅडमिंटनला पसंती दिली. इनडोअर खेळांच्या परवानगीसाठी देशभरातील बॅडमिंटन प्रशिक्षकांनी पंतप्रधानांसह इतरांना साकडे घातले. त्यानंतर दोन महिन्यांपासून इनडोअर बॅडमिंटनला परवानगी मिळाली आहे. 

सांगलीतील धीरजकुमार बॅडमिंटन ऍकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक धीरजकुमार गेल्या काही वर्षांपासून बिहारमधून येथे स्थायिक होऊन खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. स्वखर्चातून आणि काहींच्या मदतीने त्यांनी खासगी कोर्ट उभारले आहे. लॉकडाऊन काळात खेळाडूंना ऑनलाईन मार्गदर्शन केले. फिटनेस आणि जीम वर्कआऊटसह खेळातील बारकाव्यांची माहिती दिली. त्याशिवाय पालकांना देखील जागृत ठेवले. त्याचा परिणाम म्हणून खेळाडू पुन्हा कोर्टकडे वळले आहेत. सध्या शंभरहून अधिक खेळाडू सराव करतात. आगामी वर्षातील स्पर्धेत कामगिरी चांगली होण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. 

सांगलीकरांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे इथल्या प्रशिक्षणामुळे तसेच कामगिरीवर वैयक्तिक लक्ष दिले जात असल्याने थेट दिल्ली आणि गुजरातसह काही राज्यातून खेळाडू येथे येतात. 15 दिवस किंवा महिनाभराचे प्रशिक्षण घेऊन जातात. काही खेळाडू वर्ष-वर्षभर थांबून प्रशिक्षण घेतात. लॉकडाऊन काळात इनडोअर बॅडमिंटन आणि जीम चालकांवर मोठे संकट आले होते. परंतु नुकतेच खेळाला परवानगी मिळाल्यामुळे आणि पालकांमध्येही फिटनेसबाबत जागृती झाल्यामुळे त्यांनी पाल्यांना खेळाकडे वळवले आहे. त्यामुळे सांगली परिसरातील बॅडमिंटन कोर्टवर पुन्हा शटल सर्व्हिस पहायला मिळते. 

"लॉकडाऊन काळातही आम्ही ऑनलाईन कोर्टवरून खेळाडू व पालकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे खेळाडू पुन्हा बॅडमिंटनकडे येत आहेत. आगामी वर्षात खेळाडूंनी कामगिरी करायची असेल तर आता हिवाळी वातावरणातच अधिक सराव महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.'' 

- धीरजकुमार (बॅडमिंटन प्रशिक्षक) 

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT