SLP 
पश्चिम महाराष्ट्र

संघर्ष टाळण्यासाठी टोल नाक्‍यांवर पोलिस बंदोबस्त

तात्या लांडगे

सोलापूर : वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सावळेश्‍वर व वरवडे टोल नाक्‍यांवर रविवारी (ता. 15) वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. फास्ट टॅगमध्ये किमान 50 रुपयांचा बॅलन्स असावा लागतो मात्र, काही वाहनधारकांना त्याची माहिती नसल्याने तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, टोल नाक्‍यांवरील संघर्ष टाळण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

हेही वाचाच... ठरलं...कर्जमाफीची कट ऑफ डेट 31 ऑगस्ट !



टोल नाक्‍यांवरुन प्रवास करताना रविवारपासून (ता. 15) प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील 55 टक्‍के वाहनधारकांकडे फास्ट टॅग नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही वाहनांकडे टॅग असतानाही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पैसे भरावे लागल्याचेही पहायला मिळाले. टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करीत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. आगामी 10 दिवस पोलिस बंदोबस्त जैसे थेच असणार आहे. दरम्यान, दुप्पट रक्‍कम भरायला लागू नये म्हणून वाहनधारकांनी फास्ट टॅगचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक संजय कदम यांनी केले आहे.


हेही वाचाच...'जीपीएस'द्वारे धावणार सोलापुरची परिवहन बस


ठळक बाबी...
- सोलापूर जिल्ह्यातील 45 टक्‍के वाहनधारकांनी घेतले फास्ट टॅग
- सावळेश्‍वर व वरवडे टोल नाक्‍यांवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात
- फास्ट टॅगमध्ये किमान 50 रुपयांचा बॅलन्स शिल्लक असणे आवश्‍यकच
- तांत्रिक अडचणी आल्या तरीही वाहनधारकाला भरावा लागणार दुप्पट रक्‍कम
- टोल कर्मचारी अन्‌ वाहनचालकांमध्ये शाब्दीक चकमकी : पोलिसांनी केली मध्यस्थी
- वाहनांच्या रांगा कमी करण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बंद


हेही वाचाच...सोलापूर जिल्हा बॅंकेला मिळणार 879 कोटी !

परिस्थिती सुधारेपर्यंत पोलिस बंदोबस्त राहणार
फास्ट टॅग काळाची गरज असून आतापर्यंत सुमारे 45 टक्‍के वाहनचालकांनी त्याचा वापर सुरु केला आहे. ज्यांच्याकडे फास्ट टॅग नाही, त्यांना दुप्पट रक्‍कम भरावीच लागेल. फास्ट टॅगमध्ये किमान 50 रुपयांचा बॅलन्स असणे आवश्‍यक आहे मात्र, बहूतांश वाहनचालकांना त्याबद्दल माहितीच नाही. 10 दिवसांत परिस्थिती सुधारुन प्रत्येक वाहनाला फास्ट टॅग असेल, असा विश्‍वास आहे. तोवर टोल नाक्‍यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- संजय कदम, संचालक, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahad Chavdartale : 'कागदावर नको, प्रत्यक्ष काम दाखवा'; महाडच्या चवदार तळ्याची पाहणी करत आनंदराज आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

Jalna News: इंधन पुरवठा विस्कळित, ३७ पेट्रोल पंप बंद वाहनचालकांची गैरसोय ; साखळीत व्यत्यय आल्याने उद्भवली परिस्थिती

Mumbai: दादर स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार! इडली विक्रेत्याकडून पदार्थांसाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर, व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

SCROLL FOR NEXT