Police arrested people in Parner taluka 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यविधीला गेला नि पोलिसांनी ताब्यात घेतला

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः मुळचे तालुक्यातील रहिवाशी असलेल्या एका कुटुंबातील महीलेचे घाटकोपर येथे निधन  झाले. मात्र अंत्यविधीनंतर ही मंडळी तालुक्यातील या आपल्या मूळ गावी येत असताना त्यांना ठाणे पोलीसांनी मुरबाड येथेच ताब्यात घेतले. कारण त्याच महिलेचे निधन कोरोनाने झाले होते, असा संशय आहे.  त्यामुळे त्यांना पारनेरला येण्यापासून पोलिसांनी अडवल्याने पारनेरकर कोरोनापासून बचावल्याची भावना तालुक्यातील जनतेची झाली आहे.

या बाबत माहीती अशी की, सध्या नोकरी निमित्ताने मुंबईस आई, मुलगा व सून असे तिघे जणांचे कुटुंब  घाटकोपरला राहात होते. मंगळवारी त्या मुलाच्या आईचे निधन झाले. त्यानंतर अंत्यविधी गावाकडे करण्याचा विचार करत मुलाने खूप प्रयत्न केला. मात्र शेवटी तो यशस्वी झाला नाही. शेवटी बुधवारी रात्री घाटकोपरलाच अंत्यविधी केला. 

अंत्यविधीस गावाकडून त्या मयत महिलेची मुलगी व एक नातवाईक गेले होते. त्या मुलाने आईच्या  अत्यंविधीनंतर मुलगा, त्याची पत्नी व गावाकडून दोघे असे चार जण गेले होते. ते परत येत असताना त्या चौघांनाही ठाणे पोलीसांनी मुरबाड येथे ताब्यात घेतले.
या मयत महिलेचा कोरोना व्हायरसने निधन झाले होते. त्या कुटुंबातील मुलगा व तिची सून तसेच अंत्यविधीस गेले दोघे असे चौघे पारनेर तालुक्यात आले असते तर नाहक त्रास सहन करावा लागला असता.

घाटकोपर येथीलच काही सतर्क नागरीकांनी ही माहीती प्रशासनास दिली. सर्व यंत्रणा हलली व त्यांना मुरबाड येथेच पोलीसांनी ताब्यात घेतले. त्या लोकांना कोरोनाची लागण आहे की नाही हे माहिती नाही. परंतु पारनेरकरांंच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिका-यांनी ही सतर्कता बाळगली, अशी भावना तालुक्यातील जनतेची झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT