कुकुडवाड (जि. सातारा) : पुण्यातील महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या 80 वर्षीय पुजाऱ्याला शेनवडी (ता. माण) येथील मंदिरातून अटक करण्यात आली. बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की, असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. शिष्यांच्या मदतीने त्याने महिलांचे मोबाईल नंबर मिळवल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा - आम्ही सीबीआयचे आहाेत; तूझ्या गाडीत दारु आहे ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा पुजारी उच्चशिक्षित असून इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. माण तालुक्यातील शेनवडी गावातील एका मंदिरातून या पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुजाऱ्याने शिष्यांच्या मदतीने महिलांचे फोन नंबर मिळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा - पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले
महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या 80 वर्षीय पुजाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की, असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे.
हा पुजारी उच्चशिक्षित असून इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. माण तालुक्यातील शेनवडी गावातील एका मंदिरातून या पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुजाऱ्याने शिष्यांच्या मदतीने महिलांचे फोन नंबर मिळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हेही वाचा - एनडीआरएफचे जवान मानवतेचे पुजारी : प्रा. डॉ. एन. डी. पाटील
शेणवडी गावच्या सरपंचांना देखील या पुजाऱ्याचे वागणे खटकल्याने पुजाऱ्याने गाव सोडावे असा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला होता. त्यांनंतर स्वारगेट पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीने अजून काही महिलांना फसवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोणाला याविषयी माहिती असल्यास कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.