Police Diary Crime News Sangli Police esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Police Diary : जिगरी दोस्तावर गोळी झाडून मृतदेह निर्जनस्थळी पेटवला, पण एका दातामुळं खुनाचा लागला छडा

जिगरी दोस्त. त्याला विश्‍वासात घेऊन प्रथम गोळी झाडली. नंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी नेऊन पेटवला.

शैलेश पेटकर

Police Diary Crime News : जिगरी दोस्त. त्याला विश्‍वासात घेऊन प्रथम गोळी झाडली. नंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी नेऊन पेटवला. तेथील राख पोत्यात भरून कृष्णा नदीत (Krishna River) फेकली. तोच मित्र बेपत्ता असल्याचे भासवून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमवेत पायपीट करण्याचे नाटकही केले. काळ उलटला... खुनाची योजना फत्ते झाली. मात्र जिगरी दोस्ताच्या यारीने झोपच उडविल्याने बडबड वाढली आणि खुनाला वाचा फुटली. सुतावरून स्वर्ग गाठणे, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारे काम पोलिसांनी केले आणि खुनातील संशयितांना शिक्षा झाली.

सांगली पोलिसांच्या (Sangli Police) कामगिरीला उंचीवर नेऊन ठेवणारे हे खून प्रकरण सांगलीतलेच. सन २०१६ मधील ही घटना. मिंच्याचा खून खूप चर्चेत आलेला. कोणी केला, याचाच सुगावाच नव्हता. पोलिसांनी पुन्हा-पुन्हा ‘त्या’ नापीक आणि दुर्लक्षित शेतातील जळीत जागेवरच्या उरल्या-सुरल्या राखमिश्रित मातीची चाळण करणे सुरू ठेवले. एके दिवशी चाळणीत एक दात (Teeth) हाताला लागला. त्या दाताला होती कॅप. त्या कॅपवर काहीतरी क्रमांक असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी निःश्‍वास टाकला.

तपासाला गती आली... मृताची ओळख पटली आणि मग खुन्याच्या मागावर पोलिस निघाले. शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद. मात्र तपास दिला स्थानिक गुन्हे अन्वेषणला. तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बिरोबा नरळे आणि पथकाकडे तपासाची सूत्रे आली. पहिल्यांदा दोस्तांचीच यादी काढली. कोण, कोणाशी कितीवेळा बोलले, त्यांच्यापैकी मृताच्या संपर्कात कोण कितीवेळा आले, त्यांचे अखेरचे लोकेशन कुठे आणि किती वाजता होते, मृत व्यक्ती कधीपासून बेपत्ता होता, या संपूर्ण घटनाक्रमांचे धागे जुळवून पोलिसांनी खुनाला वाचा फोडली.

गुन्ह्यातील खुनी हे त्याचे जिगरी मित्रच. काही नाजूक कारणातून राग मनात होता. घटनेदिवशी मिंच्याला बोलावून घेतले. कवठेपिरानजवळ गोळी झाडली. त्याच मित्रांनी शेतात नेऊन मृतदेह जाळला आणि बेपत्ता असल्याचा बनाव केल्याचे संशयितांनी कबूल केले. केवळ घटनास्थळी मिळालेल्या दातावरून पोलिसांनी घटनेच्या कड्या जुळवत खुनाचा उलगडा केला. त्यापैकी एकास सक्तमजुरीची शिक्षा झाली. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळेच या गुन्ह्याचा छडा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT