पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत विनाकारण फिरणाऱ्या २६ जणांना दंड

सकाऴ वृत्तसेवा

विनाकारण फिरणारे, दुचाकी वापरणारे आणि चार चाकीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणारे यांची चौकशी करून त्यांना दंड केला.

मिरज (सांगली) : शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वार नागरिक चारचाकी चालकांसह आस्थापने सुरू ठेवणाऱ्यांना मिरज पोलिसांनी (Police) दंड (fine) आकारला. मार्केट परिसरात सकाळी ११ पासून पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी विशेष मोहीम राबवत नाकाबंदी (Blockade) करून विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली. अनेकांनी बोगस ओळखपत्र गळ्यात परिधान करून पोलिस प्रशासनास (Police administration) चकवा देण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी चौकशी करून अशा बनवेगिरीला आळा घातला. (Police have imposed fines on people wandering in miraj for no reason)

सकाळपासून शहरात विनाकारण गर्दी होत असल्याचे चित्र पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वेळीच पोलिसांचा फौज फाटा घेऊन मार्केट परिसरात नाकाबंदी करीत प्रत्येकाची चौकशी सुरू केली. विनाकारण फिरणारे, दुचाकी वापरणारे आणि चार चाकीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणारे यांची चौकशी करून त्यांना दंड केला.

शासन आदेश सकाळी आठ ते अकरा फक्त होम डिलिव्हरीला परवानगी असताना काहींनी दुकाने सुरू केल्याचे निदर्शनास आल्यावर अशा दोन दुकानांना एक हजाराचा दंड आकारला. चोवीस नागरिकांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला. दंड आकारलेल्या नागरिकांचे पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी प्रबोधन करून घरी सोडले. परत आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. (Police have imposed fines on people wandering in miraj for no reason)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal Snapchat Chat Viral : सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल, 'लग्न होणार नाही तरीही तिकीट काढते', तपासाला नवे वळण?

PF New Rule: PF मध्ये 1800 रुपयांपेक्षा जास्त जमा करायचे का? नवीन नियमात कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

SCROLL FOR NEXT