Crime News
Crime News 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : सम्राट कोराणेच्या शिवाजी पेठेतील घराची झडती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या संशयित सम्राट कोराणेच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेण्यात आली. तीन स्वतंत्र पथकांद्वारे त्याचा शोध सुरू असून, शहरासह जिल्ह्याबाहेर चार ठिकाणी पथकांकडून छापेही टाकल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली. 

यादवनगरातील संशयित मटका मालक सलीम मुल्ला गॅंगशी संबंधित असणाऱ्या संशयित सम्राट कोराणेवर पोलिसांनी मोकांतर्गत कारवाई केली. त्याच्यासह ४४ संशयितांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले. पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्राला चांगलाच दणका बसला. कारवाईची कुणकुण लागल्यापासून सम्राट पसार झाला आहे. त्याच्या मित्रपरिवारासह नातेवाइकांकडे याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे. तो आश्रय घेऊ शकणाऱ्या सर्व ठिकाणांवरही पोलिसांची करडी नजर आहे. आज शहर पोलिस उपअधीक्षक कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांसह थेट सम्राटच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेतली. सुमारे तासभर ही प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, त्याच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. या पथकाने निवडणुकीचा बंदोबस्ताचा ताण असतानाही आतापर्यंत शहरासह पन्हाळा, गोवा, कर्नाटकसह कोकण पट्टा, मुंबई येथे छापेही टाकले आहेत. मात्र, अद्याप तो हाती लागलेला नाही. त्याला आश्रय देणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही. सम्राटच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यापर्यंतची तयारी केली आहे. तो वेळेत न मिळाल्यास त्याला फरार घोषित करावा, या मागणीबाबतची आवश्‍यक प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असे कट्टे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT