Police stabbed at Dhorjalgaon
Police stabbed at Dhorjalgaon 
पश्चिम महाराष्ट्र

कॉपी करून न दिल्याने पोलिसावर ढोरजळगावात दगडफेक 

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्यास विरोध केल्याने एकाने पोलिस कर्मचाऱ्यास दगड मारून जखमी केले. तालुक्‍यातील ढोरजळगाव येथे श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर ही घटना घडली. पोलिस कान्स्टेबल राहुल रावसाहेब खंडागळे यांच्या फिर्यादीवरून बबन सुखदेव सांगळे (वय 43, रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


फिर्यादीत म्हटले आहे, की आज बारावीचा मराठीचा पेपर होता. त्यासाठी खंडागळे शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूस बंदोबस्त करीत असताना सांगळे मुलीला कॉपी देण्यासाठी आले. त्यांच्याकडील कॉपी हिसकावत खंडागळे यांनी त्यांना तेथून बाजूला जाण्यास सांगितले.

त्यावर, "मी आर्मीमध्ये सुभेदार आहे. तुझ्याकडे पाहून घेतो. मी तर कॉपी देणारच. तू काय करतोस ते पाहून घेतो,' असे म्हणत सांगळे यांनी शिवीगाळ करीत धक्काबुकी केली. खंडागळे यांच्या अंगावर दगड फेकले. त्यात ते जखमी झाले. शेवगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. 


शेवगाव येथे बारावीच्या परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी कॉप्यांचा सुळसुळाट झाला होता. "सकाळ'ने याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर शेवगावच्या शैक्षणिक वर्तुळात व पालकांमध्ये तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने आज परीक्षा केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला.

त्यामुळे कॉप्यांना काही प्रमाणात आळा बसला. शहरातील एका केंद्रावर कॉपी देण्यावरून दोन शिक्षकांमध्येच खडाजंगी झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT