Police took the two wheels off the road 
पश्चिम महाराष्ट्र

दुचाकी चोरीची तक्रार द्यायाल पोलिसांत चालले तोपर्यंत...

सकाळ वृत्तसेवा

खानापूर : रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला. 

त्याचे असे झाले, शिरोलीतील देवीदास अय्यर यांनी त्यांच्या बहिणीला बाळंतपणासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. प्रसुतीवेदना सुरु असल्याने घाईघाईत बहिणाला घेऊन रुग्णालयात आले होते. या गडबडीत त्यांनी दुचाकी रुग्णालयासमोर रस्त्याकडेला थांबविली. ते रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते. पण, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्रभर शोध घेऊन ते घरी गेले. दुचाकी चोरीला गेल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने पोलिसात तक्रार देण्याची तयारी करुन ते खानापूरला आले. बहिणीला भेटून पोलिसात तक्रार देऊ असे ठरवून ते रुग्णालयात आले. 

तेथे त्यांना माजी आमदार अरविंद पाटील भेटले. त्यांनी हा प्रकार माजी आमदारांना कथन केला. माजी आमदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन तक्रार घेण्यास सांगितले. देवीदास अय्यर तक्रार देण्यासाठीच निघालेच होते. तेवढ्यात माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एका दुचाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगून शहानिशा करण्यास अय्यर यांना सांगितले. अय्यर यांनी फोटो बघून ती आपली दुचाकी असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला थांबवलेली दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी गस्तीवरच्या पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात नेऊन ठेवली होती. दुचाकी मिळाल्यानंतर श्री. अय्यर यांचा जीव भांड्यात पडला. 

नुकसान टाळण्यासाठीच उपक्रम 
गेल्या महिन्यात शहरासह ग्रामीण भागातून सात दुचाकी चोरीला गेल्या असून चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला किंवा घरासमोर असुरक्षितपणे थांबविलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्याचा नवा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. चोरीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी असे केले जात आहे. त्याचा मनस्ताप दुचाकीचालकांना होत असला तरी दुचाकी चोरीला गेल्यानंतर होणारे नुकसान टळावे एवढाच त्यामागचा हेतू असल्याचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सोशल मीडियाचा लाभ 
रात्रीच्यावेळी शहरांतर्गत महामार्ग तसेच सरकारी कार्यालयांसमोर थांबविलेल्या दुचाकी पोलीस स्थानकात लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गेल्या आठवडाभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले जात असल्याने दुचाकीमालकांचा मनस्तापही वाचत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT