Vishrambag Sangli Atrocity Case esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Police : सांगलीत कॉलर धरून, जातिवाचक शिव्या देत पोलिसाला मारहाण; विश्रामबाग पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

विशाल शिंदे सांगली पोलिस दलात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पारेखने विशाल शिंदेंची कॉलर धरून मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ करत दमदाटीही केली.

सांगली : विश्रामबाग येथील जयहिंद कॉलनीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यास किरकोळ कारणातून मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ झाली. नितीन पारेख (विजय अपार्टमेंट, जयहिंद कॉलनी) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा नोंद झाला.

पोलिस कर्मचारी विशाल विजय शिंदे (वय ३७, शंभर फुटी रस्ता, शामरावनगर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी माहिती दिली, की विशाल शिंदे सांगली पोलिस दलात आहेत. सध्या ते पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत.

काल सायंकाळी सहाच्या सुमारास ते जयहिंद कॉलनीतील विजय अपार्टमेंटच्या गाळा क्रमांक सहात आले होते. संशयित पारेख व्हीएस मल्टिसर्व्हिसेस येथे आला. त्याने किरकोळ कारणातून गौरव देशमुख यास मारहाण सुरू केली. हे पाहून शिंदे तेथे गेले. वाद सोडवण्यास मध्यस्थी केली.

पारेखने विशाल शिंदेंची कॉलर धरून मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ करत दमदाटीही केली. त्यानंतर काल रात्री उशिरा शिंदे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नितीन पारेखवर मारहाणीसह ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Charges: किमान बॅलन्सचा फटका!बँकांनी ४ वर्षांत ग्राहकांकडून वसूल केले २६,१७० कोटी; तुमच्याही खात्यातून पैसे कापले?

FDAच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे, मंत्र्यांच्या हॉटेल्सवर कारवाई केली का? सवाल उपस्थित

Education Crisis: शाळा बुडायची वेळ; पण नाही स्थलांतर! मराठवाडी धरणातील विद्यालयासमोर पेच; २९ वर्षांपासून भिजतेय घोंगडे

Latest Marathi News Live Update : अमरावती मार्गावर भीषण अपघात, एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

England Cricket, Test Coach: ब्रेंडन मॅक्युलम OUT? इंग्लंडला मिळणार नवा कोच; CSKशी नातं तोडलेल्या दिग्गजाची एन्ट्री!

SCROLL FOR NEXT