ajit_pawar 
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवार म्हणतात राजकारणात शब्दाला महत्त्व नसते?

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडद्यामागे घडलेल्या नाट्यमय घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. सत्तेजवळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी समाधान आवताडे यांच्या गटाला दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आपला कौल भाजप समविचारी आघाडीला दिल्यानंतर, संख्याबळ कमी लागताच त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा "आम्ही अध्यक्षपदासाठी भाजपला शब्द दिला आहे, तो शब्द मी बदलणार नाही' असे आवताडे यांनी सांगताच अजितदादा यांनी "राजकारणात शब्दाला महत्त्व नसते, परिस्थिती बघून शब्ददेखील बदलावे लागतात' असे विधान केले. याची चर्चा सध्या तालुक्‍यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मंगळवेढा तालुक्‍याची निर्णायक भूमिका
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगळवेढा तालुक्‍याने निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसून आले. अवघ्या तीन सदस्यांच्या जोरावर जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात स्वतःच्या घरात एकही पद न मागता कार्यकर्त्यांना पदे मिळवून देण्याची ताकद लावण्यात समाधान आवताडे हीरो ठरले. सुरवातीच्या काळात या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना गृहीत न धरल्याचा फटका बसला आहे.

शब्दाला ठाम राहिल्याने भाजप-समविचारी पक्षांची सत्ता
शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने दोन्ही पदांची ऑफर दिली; पण दिलेल्या शब्दाला समाधान आवताडे ठाम राहिल्याने भाजप - समविचारी पक्षांची सत्ता स्थापन करता आली. पुण्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार संजय शिंदे यांच्या बरोबरीने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे देखील उपस्थित होते. अतिविश्‍वासू नेत्याने निर्णय प्रक्रियेत संजयमामांना सोबत घेतले नाही; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याची माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT