SHAMBHURAJE PUTALA 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये शंभूराजेंचा पुतळा हटवला... आता तेथे अफजल खानाचा पुतळा बसवायचा काय, मनसेचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

नगर - हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी पहाटे सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात गनिमी कावा करीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविला. या प्रकाराची माहिती समजताच  महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न  उद्भवू नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहेे.

पुतळा हटविल्याने शंभूप्रेमी व शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाकडून होत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास सुमित वर्मा, घनश्याम बोडखे यांच्यासह काही शंभूप्रेमी कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.

या याची माहिती मिळताच डिवायएसपी संदीप मिटके यांच्यासह तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून  प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिस म्हणतात कायदा सुव्यवस्था

पोलिसांना नेमकी कशाची भीती आहे. संभाजी राजांच्या पुतळ्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊच कशी शकते, याबाबतचा सवाल शंभूप्रेमी करीत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात संभाजीराजांचा पुतळा बसविण्यात यावा, यासाठी महापालिकेकडे मागणी करण्यात येत आहे. या पुतळ्याबाबत २००७मध्ये ठराव झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. यासाठी आमच्या काही कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून लक्ष वेधलं होतं. आज बसवू, उद्या बसवू असे करीत महापालिका वेळ मारून नेत आहे. पोलिसांची परवानगी नसल्याचे सांगितले जाते. नेमकी पोलिसांना काय अडचण आहे हेही समजत नाही, असे मनसेचे सुमित वर्मा यांनी सांगितलं.

नक्की विरोध कोणाचा, हेही सांगावं

शहराच्या मध्यवस्तीतील चौकात छत्रपती शंभूराजेंचा पुतळा लावायचा नाही तर काय अफजल खानाचा पुतळा बसवायचा का, असा सवालही वर्मा यांनी केला आहे. ते म्हणतात, महापालिकेने राजेंचा पुतळा पुन्हा तेथे बसवावा अन्यथा बलिदान दिनी आंदोलन केले जाईल. महाराजांचा पुतळा बसवल्याने आमच्यावर गुन्हे दाखल करता, मग आपण नेमके कोणत्या राज्यात राहतो. पोलिसांनीही कायदा सुव्यवस्था कशी काय निर्माण होऊ शकते, याबाबत लोकांना सांगावं. त्यामुळे नेमका कोणाचा विरोध आहे, हेही कळेल, असेही वर्मा म्हणतात. पुतळा काढण्याबाबत महापालिकेने जेवढी तत्परता दाखवली तेवढी शहरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत का केली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

महापालिका म्हणते..

प्रोफेसर कॉलनी चौकात पुतळा बसवण्याबाबत प्रस्ताव होता.मात्र, त्याला पोलिसांचा विरोध होता. आज पहाटे पोलिसांचा मला फोन आला. त्यांनी पुतळा तातडीने काढून घेण्यास सांगितलं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने मी कर्मचार्यांसह तेथे गेलो. राजांचा पुतळा काढून तो सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे, असे मत महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी सांगितले.

राजेंच्या पुतळ्याला अडचण काय..

महासभेने प्रोफेसर कॉलनी चौकात संभाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत ठराव केला आहे. मात्र, प्रशासन पोलिसांचे कारण पुढे करते. तेथे पुतळा बसविल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणच कसा होऊ शकतो. नेमका कोणाचा विरोध आहे. हे संपूर्ण शहराला कळू देत. मी या पुतळ्याबाबत आत्मदहनाचाही इशारा दिला होता. तरीही कार्यवाही झाली नाही. आता मीच महासभेत हा प्रश्न जोरदारपणे उचलून धरणार आहे, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सकाळला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: इंदापूरमध्ये तीव्र राजकीय संघर्ष, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT