Revolver Gun esakal
पश्चिम महाराष्ट्र

Revolver Gun Licence : तुम्हालाही 'बंदूक' हवीये? मग, परवान्यासाठी 'हे' अडथळे पार करा; कुटुंबाचं संमतीपत्र आवश्यक

महाराष्ट्रात सध्या ८४ हजार लोकांकडं आहे शस्त्र परवाना

सकाळ डिजिटल टीम

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी एक अट खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे.

सांगली : धनसंपत्तीत भरघोस वाढ झाली, की काही लोकांना दोन गोष्टींचे डोहाळे लागतात. पहिली म्हणजे राजकारणात प्रवेश आणि दुसरी म्हणजे कमरेला एखादे परवानाधारक शस्त्र लावून फिरणे. दोन्हीत नुसता रूबाब...

राजकारणात प्रवेशाची विशिष्ट नियमावली नाही, मात्र बंदूक हवी असेल तर महादिव्य. बंदूक (Gun) हाय ती, खेळणं नव्हं. त्यामुळे कडक अटी-नियम पाळलेच पाहिजेत. अन्यथा, इथे ‘रामराज्य’ नव्हे तर ‘गुंडाराज’ व्हायचे. प्रशासनाच्या एका अजब उत्तरामुळे ‘बंदूक’ हा विषय चर्चेत आला आहे.

नागरिक जागृती मंचने उपहासाने ‘सगळ्यांनाच एकेक बंदूक द्या,’ अशी मागणी केली. त्याला ‘देऊया की, अर्ज तर करा,’ असे उत्तर तहसीलदारांकडून देण्यात आले. अर्थात, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना समजही दिली. या प्रकरणातील उपहास, खिल्ली हा भाग वगळता ‘बंदूक’ नेहमीच गंभीर विषय राहिला आहे.

स्वतःची सुरक्षा आणि प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती या दोन कारणांसाठी शस्त्र परवाना दिला जातो. शिराळा तालुक्याचा मोठा भाग चांदोली जंगलालगत असल्याने त्या तालुक्यात अधिक परवाने आहेत. अनेक बडी मंडळी परवाना मिळवण्यात अडचणी येऊ नयेत, म्हणून राजकीय ताकद वापरतात.

मात्र, त्याचा फारसा फायदा होत नाही. कारण कोणतीही प्रशासकीय यंत्रणा या जीवाशी निगडित विषयात ‘रिस्क’ घ्यायला तयार नसते. त्यामुळे याबाबतच्या प्रस्तावांची छाननी बारकाईने होते. महाराष्ट्रात सध्या ८४ हजार लोकांकडे शस्त्र परवाना आहे.

या यादीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर (एक लाख ३४ हजार) असून कर्नाटक दुसऱ्या स्थानी (एक लाख १३ हजार) आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात व पश्‍चिम बंगालमध्येही शस्त्र परवानाधारकांची संख्या अधिक आहे.

शंभर अर्ज, दोन-तीन मंजूर

जिल्ह्यात प्रतिवर्षी शंभराहून अधिक नवीन अर्ज दाखल होतात. पैकी दोन वा तीन मंजूर होतात, अशी स्थिती आहे. कुणीही उठावे, बंदूक परवाना मागावा, तो मंजूर होतो, अशी स्थिती नाही. त्यामुळे परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. काही बंदुकांना परवाना लागत नाही. त्यांना एअर गन व एअर पिस्टल म्हणतात. त्याची किंमत ४ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आहे. त्यात छरे वापरले जातात. शेतात जनावरांच्या बंदोबस्तासाठी ते उपयोगात येतात.

कुटुंबाचे हवे संमतीपत्र

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी एक अट खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. या व्यक्तीस बंदूक वा शस्त्र परावाना देण्यास हरकत नाही, असे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लिहून देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाशी गोडीगुलाबीचे संबंध असणे आवश्‍यक आहे; अन्यथा पंचाईत होते.

...हे असेल तरच अर्ज करा

  • रेशन कार्ड झेरॉक्स, मतदान यादीतील नावाबाबत तहसीलदारांकडील पुरावा, जन्मदाखला

  • अर्जदार शेतकरी असल्यास शेती उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला

  • दहा वर्षे राहत असल्याबाबतचा तलाठ्यांचा रहिवासी दाखला

  • दंड, गुन्हा, शिक्षा नसल्याबाबतचे पोलिस उपनिरीक्षकांचे पत्र

  • शारीरिक, मानसिकदृष्‍ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला

  • घर व शेतीचे अंतर दाखवणारा तत्सम अधिकाऱ्यांकडील नकाशा

  • अर्जदाराच्या चारित्र्याबाबत दोन ओळखपत्रे (शासकीय अधिकारी किंवा नेते)

  • अर्जदाराच्या राहत्या घराजवळ दरोडा, चोऱ्या होत असल्याबाबत तपशील दर्शवणारा पोलिसांचा दाखला

  • शस्त्र चालवता येत असल्याबाबतचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र

  • खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, मारामारी आदी गुन्ह्यांत कधीही शिक्षा झाली नसल्याचे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर हमी दिलेले प्रमाणपत्र. गुन्हेगारी विश्‍वाशी संबंध नाही, कधीही मानसोपचार रुग्णालयात उपचार घेतले नाहीत, शांतता भंग केली म्हणून स्थानबद्धतेची कारवाई झाली नाही, शारीरिक व मानसिक दृष्टीने शस्त्र चालवण्यास सक्षम आहे, शस्त्र मिळाल्यास दुरुपयोग करणार नाही, यांच्या नोंदी त्यावर आवश्‍यक.

  • घर किंवा शेतीचा उतारा. वडिलांच्या नावे असल्यास त्यांचे संमतीपत्र.

  • व्यवसाय असल्यास त्याबाबतचा पुरावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad चे खणखणीत शतक, अर्शीन कुलकर्णीचीही १४६ धावांची खेळी! पृथ्वी शॉ याला मात्र प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले?

Amit Shah: अमित शहांच्या वक्तव्यावर माजी न्यायाधीशांची टीका; ‘दुर्दैवी’ ठरवून सभ्य राजकीय प्रचाराची गरज अधोरेखित

Pune Robbery News : मांडवी, कुडजे, आगळंब्यात चोरीच्या घटनांत वाढ; पोलिस चौकी, गस्त नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

धैर्य, संघर्ष आणि संगीत प्रवासाची प्रेरणादायी कथा, ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Pakistan News: इम्रान खान अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत पाकिस्तानातील ७५ पीटीआय नेत्यांना तीन ते दहा वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT