Pomegranate prices rise due to insufficient supply: Saffron fruit prices at Rs 70 to Rs 100 per kg 
पश्चिम महाराष्ट्र

अपुऱ्या पुरवठ्याने डाळिंब तेजीत : "भगव्या'चा दर 70 ते 100 रुपये किलो, व्यापारीच शेताच्या बांधावर

नागेश गायकवाड

आटपाडी (जि. सांगली) ः डाळिंब विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा असल्याने डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नामवंत व्यापारी डाळिंब मिळवण्यासाठी छोट्या-छोट्या शेतकऱ्यांच्या बांधावर फिरू लागलेत. भगव्या डाळिंबाचे दर सरासरी 70 ते 100 रुपये दरम्यान आहेत. 

मे महिन्यामध्ये इथेनॉल मारलेल्या डाळिंबाची फळे विक्रीसाठी आली आहेत. मात्र यावर्षी प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक बागा पूर्ण वाया गेल्या आहेत; तर अनेक बागाचे तीस-चाळीस 50 टक्के नुकसान झाले.

अशीच स्थिती जून आणि जुलैमध्ये धरलेल्या डाळिंबाची आहे. हंगाम सुरू होऊनही बाजार पेठेत डाळिंबाची आवक अत्यंत कमी सुरू झाली. सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. उत्तर भारतीतील छठ पूजाही तोंडावर आली आहे. डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत डाळिंब मिळत नाही. 

दरवर्षी यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणावर डाळिंब उपलब्ध होतो. मात्र यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत 25 टक्केही माल मिळत नाही. अनेक मोठे नामवंत व्यापारी छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या बांधावर डाळिंबासाठी फिरू लागले आहेत. सध्या डाळिंबाचे सरासरी 70 ते 100 रुपये प्रतिकिलो दर सुरू आहेत.

ग्रेड वन डाळिंबाचे प्रतिकिलो शंभर रुपये दर आहेत. गेल्या दोन दिवसांत दरामध्ये 10 ते 15 रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. तोंडावर छटपूजा आल्यामुळे आणखी 10 ते 15 रुपये दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

चांगल्या मालाचे प्रमाण कमी 
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात ग्रेड तीन आणि चार मधील भावात मोठी उसळी झाली आहे. अत्यंत लहान आणि हिरव्या कच्चा गोठ्यांनाही 40 ते 50 रुपये दर मिळत आहे. आच्छादन नसलेली फळे पावसाच्या माऱ्यामुळे खराब झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर डांबऱ्या आणि कुजवा लागलेलाच माल येतो आहे. चांगल्या मालाचे प्रमाण फारच कमी झाले आहे.  

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

Panhala Forest Ban : पन्हाळ्यातील वनक्षेत्रात पर्यटकांना नो-एन्ट्री! 'या' तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : नागपुरमध्ये भाजप उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार

Jalgaon Municipal Election : जळगावात युतीची गाडी घसरली? जागावाटपावरून खडाजंगी, गुलाबराव पाटील तावातावात बाहेर!

SCROLL FOR NEXT