Koyna Dam Patan Satara esakal
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्राच्या 'या' मागणीमुळं 'कोयना' सापडणार दुहेरी संकटात; राज्यालाही फटका बसण्याची शक्यता

उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर कोयना धरणातून मागील तीन वर्षे सतत अतिरिक्त वीजनिर्मिती केली.

सकाळ डिजिटल टीम

कोयना धरणात वीजनिर्मितीसाठी आरक्षित पाणी सिंचन व पिण्यासाठी सोडल्यास वीजनिर्मितीसाठी पाण्याची टंचाई जाणवेल.

चिपळूण : कोयना धरणातील (Koyna Dam) वीजनिर्मितीसाठी (Power Generation) आरक्षित असलेल्या कोट्यापैकी १२ टीएमसी पाणी सिंचन आणि पिण्यासाठी सोडण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातून होऊ लागली आहे. यावर्षी तापमानवाढीचे संकट असल्यामुळे उन्हाळ्यात मागणीच्या काळात कोयना प्रकल्पातून अधिक वीजनिर्मिती करावी लागणार आहे.

धरणात आधीच पाणीटंचाई आहे. त्यामुळे कोयनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती करायची की धरणातील पाणी सिंचन आणि पिण्यासाठी सोडायचे, अशा दुहेरी संकटात धरण व्यवस्थापन सापडणार आहे. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात १०५ टीएमसी पाणी साठवले जाते. यातील ६७.५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीला, तर २२ टीएमसी पाणी सिंचन आणि पिण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने सोडले जाते.

उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर कोयना धरणातून मागील तीन वर्षे सतत अतिरिक्त वीजनिर्मिती केली. त्यासाठी राखीव कोट्यातील पाच टीएमसी जादा पाणी वापरण्याची मुभा सरकारने दिली होती. यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे आधीच धरणात साठा कमी आहे. पोफळीतील वीजनिर्मिती प्रकल्पाकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागली असल्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे.

तसेच वीजनिर्मितीसाठी राखीव कोट्यातील १२ टीएमसी पाणी सिंचन आणि पिण्यासाठी सोडण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झाली आहे. सद्यःस्थितीत सांगली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षी याच कालावधीत ८८ टक्के होता. सद्यःस्थितीत कोयना धरणामध्ये ८९.०८ टीएमसी साठा उपलब्ध आहे.

टेंभू, ताकारी-म्हैसाळ योजना, नदीवरील सिंचन व बिगरसिंचन योजना याकरिता कोयना, वारणा धरण व इतर स्रोतातून एकूण उपलब्ध होणारे ४७.०५ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. त्यामुळे कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी आरक्षित पाण्यापैकी १२ टीएमसी पाणी सिंचन आणि पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला, तर वीजनिर्मितीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोयना धरणात वीजनिर्मितीसाठी आरक्षित पाणी सिंचन व पिण्यासाठी सोडल्यास वीजनिर्मितीसाठी पाण्याची टंचाई जाणवेल; मात्र अतिरिक्त पाणी सोडण्याचा अजून कोणताही निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.

-दीपक गायकवाड, उपअभियंता कोयना सिंचन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांची सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT