Power theft of Rs 6 lakh from paper mill owner; Tampering with the meter 
पश्चिम महाराष्ट्र

पेपर मिल मालकाकडून 6 लाखांची वीज चोरी; मीटरमध्ये केली छेडछाड

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) ः येथील औद्योगिक वसाहतीतील जिजामाता पेपर मिल्सचे मालक श्रीकांत ज्ञानदेव पाटील (वय 51) यांनी वीज वितरण कंपनीची सुमारे सहा लाख 38 हजार 424 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

मीटरच्या मागील बाजूस छेडछाड करून सुमारे 37 हजार 959 युनिट विजेचा वापर त्यांनी केला आहे. याप्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या ताकारी रस्ता कार्यालयातील कार्यकारी अभियंता संतोष बाबुराव कारंडे यांनी आज इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विद्युत कायदा 2003 कलम 135 व 138 प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः 23 मार्च रोजी महावितरणच्या सांगली विभागाच्या चाचणी पथकाने औद्योगिक वसाहतीत ग्राहक श्रीकांत पाटील यांच्या मीटरमध्ये काही दोष आहे का, हे पाहण्यासाठी भेट दिली. त्यावेळी एचटी मीटरिंगच्या क्‍युबीकलच्या दरवाजाला बनावट सील असल्याचे दिसले. त्यावर कार्यकारी अभियंता कारंडे यांनी पाटील यांच्या औद्योगिक कनेक्‍शनची तपासणी करण्यासाठी घटनास्थळी भेट दिली.

सोबत पंच होते. त्यांच्यासमोर मीटरची पाहणी केली. तेथे असलेल्या मीटरर्सना चार सील बनावट पद्धतीने लावल्याचे निदर्शनास आले. मीटरच्या एमडी पोर्टला सील होते व टर्मीनलला नव्हते. मीटर क्‍युबीकलच्या लॉकशी छेडछाड करण्यात आली होती. डिस्प्लेवर देखील शून्य असा आकडा नोंद होत असल्याचे दिसले. त्यानंतर मीटरची तपासणी करण्यात आली. मीटरच्या पाठीमागील बाजूला मोठे होल पाडून फेरफार केल्याचे व त्यातून वीज चोरी केली असल्याचे निदर्शनास आले. 


यानंतर मीटर पुढील तपासणी करण्यासाठी पाठवले. प्रत्यक्ष वापरापेक्षा मीटरवर वापरलेल्या विजेची नोंद कमी व्हावी अशी व्यवस्था पाटील यांनी केल्याचे दिसले. यातून 22 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान सुमारे 37 हजार 959 इतक्‍या युनिटची म्हणजे 6 लाख 38 हजार 424 रुपये किमतीची वीज वापरल्याचे निष्पन्न झाले. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT