पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : वंचित आघाडीचा प्रस्थापितांनी घेतला धसका

सकाळन्यूजनेटवर्क

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव निश्‍चित झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून आता गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्याऐवजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.

ऍड. आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सावध पवित्रा घेत विधानसभा मतदारसंघनिहाय अपेक्षित मतांची बेरीज करायला सुरवात केल्याची चर्चा आहे. दरम्यान, ऍड. आंबेडकर यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसेल, अशीही एक चर्चा आहे. 

ऍड. आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका वंचित बहुजन विकास आघाडीच्या सोलापुरातील पहिल्याच मेळाव्यात कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली होती. दरम्यान, कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत असलेल्या ऍड. आंबेडकरांनी केलेली जागांची मागणी अमान्य झाल्याने त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सोमवारी, आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेतला असून सोलापूर लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याचे नियोजन केले जात आहे.

विद्यमान खासदार ऍड. शरद बनसोडे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजीचा सूर असल्याने त्यांच्याऐवजी डॉ. महास्वामी की खासदार साबळे यांना उमेदवारी द्यायची याची बैठक घेतली जाणार असल्याचीही चर्चा आहे. साबळे यांना राजकीय व सामाजिक परिस्थितीची जाण असल्याने त्यांचे पारडे जड समजले जात आहे तर महास्वामी यांचा जिल्ह्यात जास्त संपर्क नसल्याने भाजपची जागा कमी होईल, अशी भीती भाजपला वाटू लागल्याची चर्चा आहे. 

वंचितची युवा अन्‌ महिला आघाडी कार्यरत 
वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांना माहिती होते. त्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच युवक व महिलांची स्वतंत्र आघाडीही नियुक्‍त केली असून आता बुथनिहाय प्रचाराला सुरवात केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT