Pravara has new research on the corona  
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाबाबत "प्रवरा"चे हे आहे नवे संशोधन, मान्यता मिळाल्यास...

रवींद्र काकडे

लोणी : कोरोना संशयिताचे स्वॅब तपासणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान समोर येत आहे. चाचणीसाठीही बराच कालावधी लागत आहे. रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला तरी तो कळेपर्यंत संबंधिताला मोठ्या मानसिक तणावातून जावे लागते. वेळ आणि पैसा वाचला तर संशयित वाटणाऱ्यांच्या चाचण्या करून वेळीच कोरोनाला प्रतिबंध करता येईल. त्याबाबत प्रवरा इन्सिट्यूट अॉफ मेडिकल सायन्सेसने वेगळं संशोधन केलं आहे.

केवळ एक्‍स-रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' तंत्रज्ञानातून काही सेकंदांत रुग्णांची वर्गवारी कोरोनाबाधित, कोरोना संशयित किंवा निगेटिव्ह कळणार आहे.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटनस्थित एआय फॉर वर्ल्ड संस्थेशी परस्पर सहकार्य करार करून ही प्रणाली वापरणार असल्याची माहिती प्रवरा अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, डॉ. सुरेश जंगले, डॉ. रवींद्र कारले उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, की कोरोना व इतर आजारातील फरक ओळखण्यासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठाने "एआय फॉर वर्ल्ड' संस्थेचे कार्यकारी संचालक व प्रवराचे माजी विद्यार्थी डॉ. वैभव देशपांडे यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यातून देशात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने प्राथमिक चाचणीचे तंत्रज्ञान पुढे आणले आहे.

कोरोनाच्या चाचणीत रुग्णांचा एक्‍स-रे आणि रक्त तपासणीचा अहवाल "अपलोड' केल्यानंतर फक्त पाच सेकंदांत संगणकाच्या साह्याने रुग्ण कोरोनाबाधित आहे की नाही, हे तपासता येते. या प्रणालीचे निदान 99.9 टक्के इतके अचूक आहे. या चाचणीच्या शासकीय मान्यतेसाठी प्रयत्न असल्याचे संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT