पश्चिम महाराष्ट्र

लष्करात भरती होऊन प्रवीणला करायचीय देशसेवा

युवराज इंगवले

कोल्हापूर - लष्करात भरती होऊन देशसेवा करायची आहे, असा मनोदय खेलो इंडिया स्पर्धेत कुस्तीत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवणाऱ्या प्रवीण पांडुरंग पाटील याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.  

पुणे येथे खेलो इंडिया स्पर्धा सुरू असून प्रवीणने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५५ किलो वजनी गटातील ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक पटकावून कुस्ती पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या लौकिकात भर घातली. अवघ्या १७ वर्षांच्या प्रवीणकडून चाहत्यांना सुवर्णपदकाची अपेक्षा होती. कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर प्रविणने यश खेचून आणले. प्रवीण हा कोगे (ता. करवीर) येथील आहे. मुळातच कुस्तीच्या परंपरा असलेल्या कोगे गावाचे नाव त्याने देशपातळीवर पोहचविले. प्रवीणचे आई-वडील शेतमजूर असून, आपल्या मुलाची कुस्तीबाबत असलेली गोडी लक्षात घेऊन त्याला पाठिंबा दिला.

गावातील हनुमान तालमीत प्रवीणने वस्ताद एम. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. त्यानंतर जिल्हा पातळीवर यश मिळवत असताना प्रवीणने पुणे गाठले आणि त्यानंतर प्रशिक्षक संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांपूर्वी तो आर्मी बॉईजमध्ये दाखल झाला. बरेली येथे जाट रेजिमेंटमध्ये दाखल झालेला प्रवीण गेल्यावर्षी ५४ किलो वजनी गटात अपयशी ठरला. मात्र, यावेळी कष्टाच्या जोरावर यश खेचून आणत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

प्रवीणने १०१७ मध्ये सब-ज्युनिअर स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले, तर सोनपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. या वर्षीही सब-ज्युनिअर स्पर्धेत उतरणार असून स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकाविण्याचे ध्येय असल्याचे प्रवीणने सांगितले. जाट रेजिमेंटमध्ये प्रतिनिधित्व करत असताना, त्याने आता लष्करात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले आहे. सध्या तो आठवीत शिकत असून अभ्यासातही तो हुशार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करेल, असा आशावाद वडील पांडुरंग पाटील यांना आहे.

कोगे गावाला कुस्तीची उज्ज्वल परंपरा असून जुन्या काळातील मल्ल शिवाजी मोरे यांनी गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले होते. प्रवीण यानेही तीच परंपरा कायम राखत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्ण यश मिळवत गावाचा लौकिक वाढविला आहे.
- एम. एस. पाटील,
वस्ताद

गावाला कुस्तीची उज्ज्वल परंपरा
भरत हारुगले, अमर फाटक, सुनील फाटक, महिला कुस्तीपटू माधुरी घराळ, पुष्पा मोरे यांनीही कुस्तीत उज्ज्वल यश मिळवत गावचे नाव देशपातळीवर पोहचविले असून, विक्रम मोरे, विश्‍वजित पाटील, किरण मोरे या उदयोन्मुख कुस्तीपटूंनीही कुस्तीत आपली छाप उमटवली असून, त्यांच्याकडूनही प्रवीण पाटील याच्यासारख्या यशाची ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

PM Modi's Swearing-In Ceremony: एकदम थाटात! शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा पहिला व्हिडिओ समोर

Exit Poll Plea: 'एक्झिट पोल'वाले येणार गोत्यात? 'या' प्रकरणात चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

French Open 2024 : इगा स्वैतेकची हॅट्ट्रिक; तिसऱ्यांदा कोरलं फ्रेंच ओपनवर नाव

Dhananjay Munde: बीडवासीयांनो, माझी हात जोडून विनंती... व्हिडिओ पोस्ट करत धनंजय मुंडे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT