Pray to Saibaba for my bungalow 
पश्चिम महाराष्ट्र

बंगल्यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करा 

सतीश वैजापूरकर

शिर्डी : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मर्दिनी-2 या हिंदी चित्रपटाची नायिका राणी मुखर्जी हिने आज येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईमंदिरात बाबांची करुणा भाकताना भावुक झालेल्या राणीला अश्रू अनावर झाले. "माझ्या डोळ्यांतील अश्रू हे बाबा आणि माझ्यातील गुपित आहे. मी विवाहबद्ध झाले. मला मुलगी झाली. बाबा सदैव माझ्याबरोबर होते. त्यांना धन्यवाद द्यायचे होते. आज बाबांनी बोलावले आणि मी आले,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. 

राणी मुखर्जीने साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी साईबाबांची संगमरवरी मूर्ती व भरजरी शाल देऊन तिचा सत्कार केला. मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना तिचे डोळे पाणावले होते. साईभक्त असलेल्या राणीला बाबांच्या नगरीत स्वतःचा बंगला बांधायचा होता. दहा वर्षांपूर्वी तिने त्यासाठी जागाही खरेदी केली. मात्र, ही खरेदी कायद्याच्या कचाट्यात अडकली. त्यात बराच वेळ गेला. येथे बंगला बांधण्याचे तिचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. त्याबाबत ती म्हणाली, ""तुम्ही त्यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करा.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT