पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : सातारा जिल्ह्यातील प्रत्येकासाठी महत्वपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे तसेच धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन इत्यादी) कार्यक्रम घरगुती पद्धतीने घरच्या घरी करावेत. परंतु या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973  चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील खासगी अथवा सार्वजनिक सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, सभामंडपे चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतेही धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन)  इत्यादी कार्यक्रम घररातच करावेत. या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे.
 


सातारा जिल्ह्यातील परमिट रुम बार ॲन्ड रेस्टॉरंट, 3,4,5 स्टार हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश जारी

सातारा : कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बार ॲन्ड रेस्टॉरंन्ट, 3,4 व 5 स्टार हॉटेल्स व त्यामधील बिअरबार आणि सर्व क्लब 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. हे आदेश 19 मार्च रोजीच्या सायंकाळी 5 वाजल्यापासून अंमलात येणार आहेत. कोणत्याही प्रकाराची दारु विक्री होणार नाही याबाबत  उत्पादन शुल्क विभाग अंमलबजावणी करणार आहे.

दरम्यान जिल्ह्यातील छाेटी उपहारगृहे, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, ढाबे आदी गाेष्टी तूर्तास सुरु राहतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 

सातारा : कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन सातारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायत व शहरी भागालगतच्या मोठ्या गावामधील आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 5 हजाराच्या वर आहे अशा ठिकाणच्या सर्व आडवडे जबार 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ओदशात नमुद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

SCROLL FOR NEXT