sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : नांद्रे प्राथमिक केंद्राचे ‘आरोग्य’च धोक्यात

गावचे सांडपाणी रुग्णालयाच्या परिसरात रिक्त पदांमुळे उपचारांना विलंब

बाळासाहेब गणे - सकाळ वृत्तसेवा

तुंग : नांद्रे (ता. मिरज) येथील १९८६ ला सुरवात झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘आरोग्य’च धोक्यात आले आहे. सात गावांसाठी मुख्य केंद्र असणाऱ्या या केंद्रात पाच पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेवर ताण आहे. अशातच गावातील सांडपाणी आरोग्य केंद्राच्या परिसरात असणाऱ्या एका मोठ्या खंदकात सोडले जात आहे. त्यामुळे या परिसरात व डासांसह अन्य रोगराई पसरण्याचे धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथे उपचारास येणाऱ्या रुग्णांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या सीडी वर्कचे काम सुरू आहे.

आरोग्य केंद्राला पूर्वेकडील बाजूने कंपाउंड नसल्याने अनेक उपद्‌वापी लोकांचा येथे वावर असतो. शाळेला रस्ता सोडायच्या मुद्द्यासाठी आरोग्य केंद्राचे कुंपणच अपूर्ण राहिले आहे. पुरुष शिपाई नसल्याने येथील स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. परिसरातील स्वच्छता होत नसल्याने हे आरोग्य केंद्रच आहे का, असा प्रश्न पडतो. या केंद्रांतर्गत नांद्रे व कर्नाळ या उपकेंद्रांत आरोग्य सेविकाच नाहीत. माधवनगर येथील आरोग्य उपकेंद्रातील तात्पुरते कर्मचारी येथे बोलवावे लागतात. सात गावांतील ४५ हजार लोकसंख्या असलेल्या गावासाठी नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे आरोग्य केंद्रच खोलगट भागात असल्याने दोन वेळा आलेल्या महापुरामध्ये निम्मे बुडले होते. त्या वेळी येथील सर्व यंत्रणा दुसरीकडे हलवावी लागली होती. त्यामुळे या आरोग्य केंद्राची पुनर्बांधणी करून याची उंची वाढवण्यात यावी किंवा गावाच्या मध्यभागी याचे बांधकाम व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

गतवर्षी गावात ५० खाटांच्या हॉस्पिटलची घोषणा झाली होती. सध्या ती हवेतच विरलेली दिसत आहे. नांद्रे, कर्नाळ, पद्माळे, मौजे डिग्रज, खोतवाडी, वाजेगाव, माधवनगर, हरिपूर आदी गावे या केंद्रांतर्गत येतात. सध्या काही प्रमाणात येथील आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे. यामध्ये कुटुंब कल्याण विभाग, ऑपरेशन थिएटर, वॉर्डरूम, प्रसूतिगृह यांची डागडुजी व दुरुस्ती सुरू आहे. या आरोग्य केंद्राकडून महिन्यातून एकदा प्रत्येक गावात भेट दिली जाते. क्षयरुग्णाची पाहणी करून त्यांना सुविधा दिल्या जातात.

सध्या या भागातील सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य केंद्राच्या सुविधेकडे प्राधान्याने लक्ष देताना दिसत नाही. ग्रामपंचायत प्रशासनामध्ये दोन महिला डॉक्टर असूनही आरोग्य केंद्राच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवणे, गावातील सांडपाणी आरोग्य केंद्रापासून पूर्वेला प्रवाहित करणे, आरोग्य केंद्राच्या परिसरातील खड्डा बुजवून घेणे, या परिसरात कचरा टाकण्यास मज्जाव करणे, याकडे लक्ष दिले तरच आरोग्य केंद्राचे ‘आरोग्य’ सुधारेल. आरोग्य यंत्रणेवर ज्यामुळे ताण पडतो, ती रिक्त पदे भरण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने पाठपुरावा करून रिक्त पदे तत्काळ भरावीत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे असल्याने आरोग्य यंत्रणेवर सतत ताण जाणवत आहे. तरी ही रिक्त पदे आम्हाला भरून मिळावीत.

- डॉ. आरती गुरव, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, नांद्रे

सध्या सीडी वर्कचे काम सुरू असून सांडपाणी व पावसाचे साचणारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरातील तो खड्डाही बुजवून घेण्यात येतील.

- राहुल सकळे, पंचायत समिती सदस्य, नांद्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT