private Lenders Arrested in samdoli  
पश्चिम महाराष्ट्र

समडोळीतील सावकारांच्या आवळल्या मुसक्‍या 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः मिरजेतील खासगी सावकारांपाठोपाठ आता समडोळी (ता. मिरज) येथील सावकारांच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या आहेत. समडोळीतील फोटोग्राफी व्यावसायिक वैभव वसंत साळुंखे (वय 40) यांनी कर्जाची रक्कम परफेड करूनही जादा पैशांसाठी छळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नऊ जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी सदाशिव शिंदे (39, विठ्ठलनगर, कर्नाळ), अशोक बापू म्हसकर-कोकणे (60, सोसायटीजवळ, समडोळी), श्रेणीक अशोक देवणे (38, देवणे गल्ली, समडोळी) या तिघांना अटक केली असून अजून सहा जण पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वैभव साळुंखे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे नऊ संशयितांसोबत त्यांची ओळख होती. घरगुती अडचणीसह व्यवसायासाठी त्यांनी वेळोवेळी नऊ जणांकडून कर्ज रूपाने पैसे घेतले. नऊ जणांकडून 17 लाख 85 हजार रूपये घेतले होते. पाच ते दहा टक्‍केवारीने साळुंखे यांना पैसे देण्यात आले होते. साळुंखे यांनी कर्जाची रक्कम परतफेड करूनही संशयितांनी जादाचे 15 लाख 65 रुपयांची मागणी करत होते. जादाची रक्कम देण्यासाठी संशयितांनी वेळोवेळी साळुंखे यांना मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादित नमूद आहे. 

एक संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील 
नऊ संशयितांपैकी एकजण फिर्यादिचा नातेवाईक असून एक कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. अनेक प्रकारे धमक्‍या देऊन मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली. सहा जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक उदय देसाई अधिक तपास करीत आहेत. 


अपहरण केल्याचा प्रकार 
संशयितांपैकी एकाने वैभव साळुंखे यांचे अपहरण करून दमदाटी केली होती. त्याचा साठ हजार रूपयांचा कॅमेरा जबरदस्ती काढून घेतला. घबरलेले साळुंखे 23 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाले होते. याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती; मात्र दोन दिवसांनी परतल्यानंतर कुटूंबियांना सारा प्रकार सांगितला. छळाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी बेपत्ता झाल्याचे कुटूंबियांना साळुंखे याने सांगितले. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT