पश्चिम महाराष्ट्र

अवहेलना... "दिव्यांग' घालणार "यांचे' श्राद्ध 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही त्याची कार्यवाही झालेली नाही, त्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने उद्या (मंगळवारी) महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचे "श्राद्ध' घालणार आहे. जागतिक अपंग दिनादिवशी सकाळी 11 वाजता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महापालिकेत हे आंदोलन करणार आहेत.

कोट्यवधी रुपयांची तरतूद

दिव्यांगांसाठी झालेल्या ठरावाची अंमलबजावणी फक्त कागदावरच आहे. शहरातील दिव्यांगांना महापालिकेच्या गाळ्यांपैकी तीन टक्के गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचवेळी आर्थिक मदतही दिली जात असून, विविध योजनांच्या लाभाची कार्यवाही केली जात आहे. निधी अद्यापपर्यंत खर्ची घालत नसल्या कारणाने प्रहार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी सोलापूर महापालिकेस भेट देऊन दिव्यांगांचे विविध योजनेचे कामकाज व निधीबाबत विचारणा करण्यात आली. त्या वेळी जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी ही माहिती दिली. प्रहार संघटनेच्या वतीने शहरप्रमुख अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख, शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार, उपाध्यक्ष मुस्ताक शेखसंदी, सचिव संभाजी व्हनमारे, धनराज दुलंगे, प्रदीप कांबळे, अमोल जगदाळे, शब्बीर नदाफ, अयाज शेख आदींसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. मात्र प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असे आंदोनकर्त्यांचे म्हणणे आहे. 

पाच टक्के तरतूदीची अंमलबजावणी व्हावी

महापालिकेने 2013 ते आजतागायत तरतूद केलेली पाच टक्के रक्कम खर्च करावी, दिव्यांगाना विनाअट घरकूल मिळावे, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, महापालिका हद्दीतील पाच टक्के गाळे उपलब्ध करावेत, दिव्यांगांना निर्वाह भत्ता द्यावा, दिव्यांगांचा निधी दुसरीकडे वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दिव्यांगांची अवहेलना करणाऱ्यांवर ऍट्रासिटी कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी संजीवनी बारंगुळे, अंबुताई गुजले व विजयशेखर चिनवार यांनी केली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT