property transfer registration fee is now only five hundred rupees sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

Good News : मालमत्ता हस्तांतरण नोंदणी करा आता फक्त पाचशे रुपयात

धर्मवीर पाटील

इस्लामपूर ( सांगली) : इस्लामपुरात मालमत्ता हस्तांतरण नोंदणी फी आता फक्त पाचशे रुपये करण्यात आली आहे. पालिकेच्या सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे. इस्लामपूर 'क्रेडाई'ने त्यासाठी पाठपुरावा केला होता. जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्तेच्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन क्रेडाई आणि पालिका प्रशासनाने केले आहे.

म्युन्सिपल अकाउंट कोड टाइप नंबर 42 वॉर्डबुक उताऱ्यामध्ये नोंदी करताना मालमत्तेच्या व्हॅल्युएशनच्या दोन टक्के रक्कम भोगवटा  धारकाला भरावा लागत होता. यापूर्वी ती फक्त 125 रुपये अशी होती; परंतु नगरपालिकेने 2012 साली एका  ठरावाद्वारे ती रक्कम मालमत्तेच्या 2% केली होती. एखादा 25 लाख किमतीचा फ्लॅट किंवा प्लॉट नगरपालिका हद्दीमध्ये खरेदी केल्यानंतर त्याची नोंद पालिकेमध्ये करण्‍यासाठी 50 हजार रुपये आकारणी मालमत्ता हस्तांतरण फी म्हणून घेतली जात होती. ही आकारणी अवास्तव होती. शिवाय रजिस्टर खरेदीखत करताना 6 अधिक 1 अशी एकूण 7%  स्टॅम्पड्युटी भरून घेतली जाते.

त्यातील एक टक्का रक्कम पालिकेला वर्ग केली जाते. तरीसुद्धा परत पालिकेकडून नोंदणीसाठी 2 टक्के आकारणे गैर होते. त्यामुळे बहुतांश मालमत्ताधारकांनी भरमसाठ रक्कम भरावी लागत असल्यामुळे नोंदणीच केली नव्हती. त्यामुळे बिल्डरनी फ्लॅट विकल्यानंतरही त्या फ्लॅटवर बिल्डर यांचेच नाव वर्षानुवर्षे दिसून येत होते. एखाद्या भोगवाटदाराने घरपट्टी न भरल्यास बिल्डर यांना नोटीस येत होत्या. यासाठी क्रेडाई इस्लामपूर या बांधकाम व्यवसायीक संघटनेने  वेळोवेळी पाठपुरावा करून पालिकेस निदर्शनास आणून दिले होते. क्रेडाई राज्यअध्यक्ष राजीव पारीख यांनी महाराष्ट्रातील इतर पालिकांमध्ये होणाऱ्या आकारणीबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार क्रेडाई इस्लामपूरने त्याचा पाठपुरावा करून मालमत्ता हस्तांतरण फी इतर नगरपालिकेप्रमाणे आकारण्याची मागणी केली होती.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील व मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. सभेत रहिवासी वापरासाठी 500 रुपये व वाणिज्य वापरासाठी 1000 रुपये अशी रक्कम ठरवण्यात आली आहे. या निर्णयात उपनगराध्यक्ष दादासो पाटील, विक्रम पाटील, शहाजी पाटील, चिमण डांगे, संजय कोरे, आनंदराव पवार, विश्वनाथ डांगे, खंडेराव जाधव, अमित ओसवाल, वैभव पवार यांचा पाठिंबा महत्वाचा ठरला.


 मालमत्ता हस्तांतरण नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
°नगरपालिकेचा नोंदणी अर्ज

°खरेदीखत किंवा बक्षीसपत्र °

सातबारा किंवा सिटी सर्वे उतारा


"मालमत्ता हस्तांतरण फी चा मोठा प्रलंबित प्रश्न पालिकेने मार्गी लावला याबद्दल नागरिकांच्यात समाधानाची भावना आहे."
यशवंत गुणवंत,
अध्यक्ष क्रेडाई इस्लामपूर.


"ज्या अर्थी राज्यात सर्वत्र एकच बांधकाम नियमावली लागू आहे त्याप्रमाणे सर्व शहरामध्ये कर एकसारखे असणे गरजेचे आहे. पालिकेने सकारात्मक निर्णय घेतला असून मालमत्ताधारकांनी लवकर नोंदणी करून घ्यावी."
उमेश रायगांधी,सचिव क्रेडाई इस्लामपूर


"नोंदीची कामे रखडली होती, त्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. नोंदीच्या अर्ज सात दिवसांच्या आत निकाली काढण्याचा आदेश संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना दिला आहे, त्याची कडक अंमलबजावणी होईल."
अरविंद माळी,मुख्याधिकारी, इस्लामपूर.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT