Public notice of summons to 870 non-payment of loan for gas connection 
पश्चिम महाराष्ट्र

गॅस शेगडीचे कर्ज थकीत ठेवणारे गॅसवर 

सकाळवृत्तसेवा

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेतून गॅस कनेक्‍शनसाठी कर्ज घेऊन हप्ते न भरणाऱ्या 870 जणांना आणि प्रत्येक कर्जदाराच्या दोन जामीनदारांना जाहीर समन्स नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे गॅस शेगडीसाठी कर्ज घेऊन परतफेड न करणारे गॅसवर आले आहेत.

अवसायनातील वसंतदादा बॅंकेच्या अवसायनाचा कालावधी संपत आल्यामुळे वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली आहे. अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी नुकतेच 59 कर्जप्रकरणात जामीनदारांसह 103 जणांना मिळकतीवर सरफेसी ऍक्‍टनुसार कारवाईसाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना 60 दिवसांची मुदत दिली असून नंतर मालमत्तेचा ताबा घेऊन लिलावाने विक्री केली जाणार आहे. तसेच सहा कर्जदारांनी बॅंकेची फसवणूक केल्याबद्दल त्यांना फौजदारी कारवाईची नोटीसही बजावली आहे.

थकीत कर्जदारांकडून वसुलीसाठी मोहीम राबवली जात असताना बॅंकेकडून 2000 मध्ये गॅस कनेक्‍शनसाठी सिलिंडर व शेगडी घेण्यासाठी म्हणून शेकडो कर्जदारांनी कर्ज घेतले होते. कर्जासाठी द.सा.द.शे. 16.5 टक्के दराने व्याज देण्याचे कबूल केले होते. कर्जफेडीची मुदत 2003 सालापर्यंतच होती. परंतु त्यानंतरही शेकडो कर्जदारांनी रक्कम परतफेड केली नाही. त्यामुळे अवघ्या काही हजारांच्या कर्जाची थकबाकी वाढत गेली आहे. अवसायकांनी बड्या कर्जदारांबरोबर या छोट्या कर्जदारांच्या वसुलीकडे लक्ष दिले आहे.

अवघ्या दोन हजारापासून ते 20 हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या 870 कर्जदार आणि प्रत्येकी दोन जामीनदार यांना जाहीर समन्स नोटीस काढली आहे. 2012 पासून थकीत कर्जासाठी समन्स काढून लेखी अथवा तोंडी म्हणणे समक्ष किंवा वकिलांमार्फत कागदपत्रांसह 15 दिवसांत सादर करावा असे नोटिशीत म्हटले आहे. समाधानकारक खुलासा न झाल्यास सहकारी कायदा 1960 च्या कलम 105 नुसार निवाडा केला जाईल. थकबाकीची वसुली सक्तीने करावी लागेल. तसेच नोटिशीबाबत 18 फेब्रुवारी रोजी बॅंकेच्या प्रधान कार्यालयात सुनावणीस हजर रहावे, असे नोटिशीत म्हटले आहे. 

वीस वर्षांपूर्वीच्या गॅसच्या कर्जासाठी उशिरा का होईना कर्जदार व जामीनदारांना नोटिसा बजावून त्यांना कारवाईच्या गॅसवर ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Personal Loan: जर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावे लागेल? पर्सनल लोनचे 'हे' नियम तुम्ही वाचलेत का?

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील पहाटेची दृश्ये

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

SCROLL FOR NEXT