पश्चिम महाराष्ट्र

पुलवामा हल्ला; अजित डोवालांची चौकशी करा, सगळं बाहेर येईल- राज

सकाळन्यूजनेटवर्क

कोल्हापूर- कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी एका कार्यक्रमादरम्यान मोदी सरकारवर निशाणा साधला. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली तर सगळी माहिती बाहेर पडेल, असा आरोपही त्यांनी केला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर अशीच एखादी घटना घडवली जाईल असा घणाघात राज ठाकरेंनी केला.

एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये चालत आलंय. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झालीय. बातम्या पसरवल्या जाताहेत, पेरल्या जात आहेत. त्यामुळे नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणं जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात सरकारकडून काहीतरी मोठं घडवलं जाईल, अशी शंका राज यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले की, आजच्या सरकारच्या काळात वर्तमानपत्रं, वाहिन्या, सीबीआय, रिझर्व्ह बँक, पोलीस, लष्कर या सगळ्यांमध्ये दोन गट झालेत. हे लक्षण देशासाठी चांगलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर युद्धाच्या, काश्मीरच्या बातम्या सुरू झाल्या आणि चार-साडेचार वर्ष ज्यावरून आरडाओरड सुरू होती, ते विषय बंद झाले. त्याबरोर, नीरव मोदी, चोक्सी ही लोकं मोदींच्या काळात हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाली. त्यावेळी श्रीदेवी गेल्याची बातमी आली आणि सगळ्या बातम्या बाजूला पडल्याची आठवणही त्यांनी करून दिली. 

आता पुलवामा हल्ल्याच्या बातम्या सुरू आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान एवढंच तुमच्यापुढे उभं केलं जातंय. एक बुवाजी उभा करायचा आणि देशाचं लक्ष त्याच्याकडे वळवायचं, हे अमेरिकेत अनेक वर्षं चालत आलंय. तेच आपल्याकडेही सुरू असल्याचा घणाघाती आरोप राज यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Alert : पुण्यात 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचे वितरण नाही; नागरिकांनी काळजी करू नये, एफडीए

Heart Attack Case Kolhapur : हर्ट अटॅकला वय राहिलं नाही, २४ वर्षीय सोहम मित्रांसोबत फिरायला गेला अन् घरी परतलाच नाही

माेठी बातमी! 'स्टार फार्मा वितरकाकडून डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त'; औषध प्रशासनाची कारवाई, शासनाने काय आदेश दिले?

Buddhist Community : 'आता बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांनाही मिळणार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र'; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे आदेशात?

Sanju Samson: संघासाठी ९व्या क्रमांकावरही फलंदाजी करेन, प्रसंगी...! संजू हसनू बोलला, पण त्याच्या व्यथा डोळ्यांतून जाणवल्या Video

SCROLL FOR NEXT