Raghunath Patil criticizes BJP 
पश्चिम महाराष्ट्र

भाजप दुतोंडी गांडूळ : रघुनाथ पाटील

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""सावरकर यांनी, गाय ही उपयोगी पशू आहे. तिचा उपयोग झाला की कत्तलखान्यात पाठवा, असे दुर्दैवी विधान केले. दुसरीकडे हेच भाजपवाले सावरकर- सावरकर अशा बोंबा ठोकत आहेत. भाजपवाले मुळातच दुतोंडी गांडूळ आहेत,'' असा हल्लाबोल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला.

""भाजप सरकारने गोवंशहत्येविषयी कायदा राज्यात लागू केला. एकमताने ठरावही संमत केला त्या वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले झोपले होते का,'' असा टोलाही त्यांनी लगावला. 

शासकीय विश्रामगृहात आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पठारे, हनुमंत वीर, संदीप उघडे, जालिंदर यादव, किरण कराळे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ""राज्याला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारच्या जलसंजीवनी योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र, या सर्व फायली लाल फितीत अडकल्या आहेत. अरबी समुद्राला पाणी वाया जात असलेले पाणी जलसंजीवनी योजनेतून समचराद्वारे इकडे वळविल्यास 500 ते 600 टीएमसी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी कुठेही संघर्ष होणार नाही. 

कर्जमाफी म्हणजे लूट

सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. मोठ्या थाटात विनाअटी- शर्तींची कर्जमाफी असल्याचा सूर आळवला. मात्र, आणखी कागदपत्रे मागवून शेतकऱ्यांना जेरीस आणण्याचे काम सुरू आहे. ही कर्जमाफी नसून लूट असल्याचा आरोप पाटील यांनी केला. 
 

बळिराजा पक्ष लढविणार निवडणुका

आगामी काळात बळिराजा पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढविल्या जाणार आहेत. जलसंजीवनीचा जनजागर, तसेच शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी (स्व.) बबनराव काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक बुधवारी (ता. 15) सकाळी साडेअकरा वाजता औरंगाबाद येथे पार पडणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT