prithviraj patil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

माधवनगर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल चौपदरी होणार...नविन प्रस्ताव सादर : पृथ्वीराज पाटील यांचा पाठपुरावा 

घनशाम नवाथे

सांगली-  नांद्रे ते सांगली रेल्वे मार्गावरील माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण तसेच वाढीव बांधकामासाठीचा नवा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. यापूर्वीचा प्रस्तावित पूल अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होईल, त्यामुळे तो रूंद करावा अशी मागणी कॉंग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा पूल आता चौपदरी रस्त्यासह विस्तारित स्वरूपात होणार आहे. 

नांद्रे ते सांगली या रेल्वे किलोमीटर क्रमांक 269-967 उड्डाणपूल नं.503 चे नूतनीकरण करून बांधकाम करण्यास रेल्वे विभागाने प्रस्तावित केले आहे. चिंतामणीनगर येथील हा पूल बाहेरून 12 मीटर रुंदीचा तसेच आतून 10.50 मीटर रुंदीचा प्रस्तावित केला होता. परंतु या मार्गावरील मोठी वर्दळ लक्षात घेता हा पूल अपुरा ठरू शकतो. त्यामुळे तिथे तो विस्तारित स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी श्री. पाटील यांनी केली होती. या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नवीन प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूरकडे पाठवलेला आहे. 

नविन प्रस्तावानुसार हा पूल आता फुटपाथसह 14 मीटर रुंदीचा आणि आतून "कॅरेज वे' सह 10 मीटर रुंदीचा होणार आहे. हा रस्ता सांगली-तासगाव-विटा ते मायणी, फलटण, बारामती, अहमदनगर, कुसुंबे, दौंडाईजा असा या राज्य मार्ग क्रमांक 60 म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचा साखळी क्रमांक किलोमीटर 194/115 असा आहे. या रस्त्यावरील वाहतूक वर्दळ 52 हजार 897 मेट्रिक टन असून पीसीयु (पॅसेंजर कार युनिट) 28 हजार 321 इतका आहे. या रस्त्याची रुंदी तीस मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाला जोडणारे मार्ग सोडून चार पदरी रस्ता आहे. त्यामुळे सदरचा पूल चौपदरीकरणासह विस्तारित स्वरूपात पूर्ण करणे आवश्‍यक आहे. 

पुलाच्या बांधकामासाठी 5.67 कोटी रुपये खर्च येणार अपेक्षित आहे. पुलाच्या बांधकामासाठी येणाऱ्या वाढीव खर्चाची शंभर टक्के जबाबदारी घेऊन ती रेल्वे विभागाकडे वर्ग करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवले आहे. या नव्या प्रस्तावामुळे चिंतामणीनगर येथील पुलाच्या विस्तारीत कामास लवकरच वेग येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून अटक, काय घडलं?

"माझ्याकडे लोनचे हफ्ते भरण्यासाठी पैसे नव्हते.." अमृताने सांगितला स्वामींचा अनुभव, "मी ढसाढसा रडले"

0.12 second viral Video : मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी नीता अंबानी काय करत होत्या? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Odisha Plane Crash : ओडीशामध्ये भीषण दुर्घटना! भुवनेश्वरहून राउरकेला जाणारे विमान कोसळले

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रत्यारोप

SCROLL FOR NEXT