Vaibhavwadi-Kolhapur Railway Project esakal
पश्चिम महाराष्ट्र

Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्पासाठी 'DPR'; आदेशाने कोकणवासीयांच्या आशा झाल्या पल्लवित

देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

या रेल्वेमार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन व वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे.

रत्नागिरी : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाचा (Vaibhavwadi-Kolhapur Railway Project) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवण्याचे आदेश निघाले आहेत. हा प्रकल्प पीएम गतीशक्तीमधून घेण्यात आला असल्यामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले.

देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. ३४११.१७ कोटींचा वैभववाडी- कोल्हापूर प्रस्तावित रेल्वे मार्ग पंतप्रधान गतीशक्ती योजनेखाली घेतल्यामुळे प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, अशी महिती नॅशनल प्लॅनिंग ग्रुपचे सेक्रेटरी सुमित डावरा यांनी दिली.

या मार्गावरील उतारामुळे लांबी २८ किमीने वाढण्याची शक्यता आहे. खरं पाहता, सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना ५० कोटीची तरतूद झाली होती. अर्थात, रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरीचा प्रतिक्षेत प्रकल्प आहे, अशी माहितीही ॲड. पाटणे यांनी दिली. कोकणचा चेहरामोहरा बदलवून टाकणाऱ्या वैभववाडी कोल्हापूर या १०७.६५ कि. मी. लांबीच्या प्रकल्पाला केंद्र सरकार कधी मंजुरी देणार, हा प्रश्न कोकणवासीयांना पडला होता. या रेल्वेमार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन व वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे.

या मार्गावर वैभववाडी, उंबार्ड, उपाले, गगनबावडा रोड, माडूळ, मल्हारपेठ, खुपिरे, रजपुतवाडी, वळीवडे, गूळ मार्केट, कोल्हापूर ही स्टेशन्स व २७ बोगदे आणि २५ पूल प्रस्तावित आहेत. ७० वळणांमधून १० स्टेशने पार करत ११० किमी वेगाने रेल्वे कोल्हापूरला पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे अॅड. पाटणे म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रातून रोज किराणा, दूध, अंडी, भाजीपाला यासारखा ८०० ते १००० टन माल कोकणात येतो. कोकणातून आंबे, मासे यांची जलद वाहतूक होईल. कोकणातील पर्यटक तिरूपती, तुळजापूर, पंढरपूर येथे जाण्याकरिता तर पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक कोकणातील गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली किनाऱ्यावर उतरण्याकरिता याच रेल्वेमार्गाचा वापर करतील.

प्रकल्प दृष्टिक्षेपात

  • लांबी - १०७.६५ किमी

  • खर्च -३४११ .१७ कोटी

  • जमीन -६३८ हेक्टर

  • कालावधी -५५ महिने

  • प्रवास वेळ -१ तास ३६ मि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

RTE Admission : आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT