पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात मेघगर्जनेसह पाऊस; परिसरात गारव्याचे वातावरण

व्यवहार बंद असल्याने पावसाचा बाजारपेठेवर परिणाम नाही

मिलिंद देसाई

बेळगाव : शहर आणि परिसरात रविवारी सांयकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शहरात गारवा निर्माण झाला. नागरिकांनाही गरमीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने पावसाचा काही ठिकाणी बाजारपेठेवर परिणाम जाणावला.

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. शनिवारी तालुक्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच कडोली, अगसगा, जाफरवाडी, हंदीगणुर, देवगिरी आदी भागात वीज खांब व झाडाच्या फांद्या कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. परंतु शहराला पावसाने हुलकावणी दिली होती. दुपारनंतर ढगांची गर्दी जमा झाल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. त्यानंतर टिळकवाडी वडगाव शहापूर गोवा शहराच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.

सीबीटी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागात चिखल निर्माण झाला होता. तर काही भागात वाऱ्यामुळे फांद्या तुटून पडल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. शहरात पावसाचा जोर कमी असला तरी पावसाची संततधार कायम असल्याने नागरीकांना अनेक वेळ घरातून पावसाचा आंनद मिळाला. दरवेळी पावसाला सुरुवात होताच फेरीवाले व भाजीविक्रेत्यांची एकच तारांबळ उडते. मात्र यावेळी सर्व व्यवहार बंद असल्याने कोणालाही त्रास झाला नाही. पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने काही वेळ घरातील पंख्यांची खरकर बंद झाली होती. तसेच पावसाच्या संततधारेमुळे शहरातील रस्त्यांवर काही प्रमाणात असणारी वर्दळही कमी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT