rajarambapu sugar factory protest raju shetti and swabhimani activist filed case sangli Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : 'राजारामबापू'वरील ठिय्या आंदोलनप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

राजू शेट्टी यांच्यासह २० प्रमुख कार्यकर्ते व अन्य १५० लोकांचा जमाव यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Sangli News: जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी तसेच १० तासांसाठी राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे गाळप बंद ठेवून कारखाना,

ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार यांचे नुकसान केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह २० प्रमुख कार्यकर्ते व अन्य १५० लोकांचा जमाव यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप महादेव पाटील (वय ५८, रा. राजारामबापू साखर कारखाना कामगार कॉलनी, राजारामनगर) यांनी याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.शुक्रवारी (ता. १) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसदराच्या निर्णयासाठी आंदोलन केले होते.

राजू शेट्टी यांच्यासह भागवत शिवाजीराव जाधव (रा. नवेखेड) महेश खराडे (तासगाव), संदीप राजोबा (ब्रह्मनाळ ता. पलूस), शमसुद्दीन संदे (इस्लामपूर), रविकिरण माने व संतोष शेळके (दोघेही रा. तांबवे) राजेंद्र माने (शिवणी, ता. कऱ्हाड), स्वस्तिक पाटील (शिरोळ, जिल्हा कोल्हापूर), सूर्यकांत मोरे (पलूस),

काशिनाथ निंबाळकर (कामेरी), प्रभाकर पाटील (रेठरे धरण), संजय बेले (समडोळी), आप्पासो पाटील (इस्लामपूर) जगन्नाथ भोसले (बावची), बाबासो सांद्रे (दुधगाव ता. मिरज), शिवाजी पाटील (इस्लामपूर), राम पाटील (शिराळा),

अनिल काळे (इस्लामपूर), रवींद्र दुकाने (वाटेगाव) असे गुन्हा दाखल झालेले प्रमुख कार्यकर्ते आहेत. या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य १२५ ते १५० लोकांचा जमाव त्यांच्यासोबत होता असेही फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शुक्रवारी (ता. १) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुपारी १२ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील बाजूच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन केले.

यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत ठिय्या आंदोलन केले. कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत कारखान्याचे गाळप बंद ठेवावे लागले होते.

त्यामुळे या काळात कारखान्याचे तसेच ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूकदार यांचे नुकसान झाले. साखर कारखान्याचे साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन या विभागाचेही लाखो रुपयांचे नुकसान झालेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी सबकॉन्शस माईंडने निर्णय घेतला" ; घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर गृहराज्यमंत्रींचं वक्तव्य; वशिला नेमका कुणाचा होता?

Raju Shetty : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिकवरी चोरी आणि काटामारी यातही लक्ष घालावे

'या' सिनेमात संजीवकुमारांनी केलेलं सचिन यांना फॉलो; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Sanju Samson: 'शुभमन गिलच्या पुनरागमनानंतर...' Asia Cup मध्ये सॅमसनच्या बदलल्या फलंदाजी क्रमावर अखेर सूर्यकुमार यादव व्यक्त

Latest Marathi News Live Update : दूषित औषधामुळे बालकाचा मृत्यू, तामिळनाडू सरकारवर सहकार्य न केल्याचा मोहन यादव यांचा आरोप

SCROLL FOR NEXT